पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत पुरेसा साठा; जूनमधील पावसावर पुढील नियोजन अवलंबूनमुंबई : गतवर्षी धरणक्षेत्रात झालेल्या चांगल्या पर्जन्यवृष्टीमुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांत सध्या ४० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत हा पाणीसाठा जास्त असून पावसाळय़ापर्यंत मुंबईकरांना पुरेसा पाणीपुरवठा करणे पालिकेला शक्य आहे. मात्र जून व जुलैमध्ये किती पाऊस पडतो यावर भविष्यातील पाणीपुरवठय़ाचे नियोजन ठरणार आहे.उन्हाचा ताप वाढू लागल्यामुळे ठिकठिकाणी पाण्याची मागणीही वाढू लागली आहे, तसेच पाणीसाठेही आटू लागले आहेत. एप्रिल महिना जवळ आला की मुंबईकरांनाही पाणीकपातीची चिंता भेडसावत असते. गेल्या वर्षी पाऊस चांगला पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे काठोकाठ भरली होती. ९९ टक्के पाणीसाठा असल्यामुळे पाण्याची वर्षभराची चिंता मिटली होती. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच आता हा साठा ४० टक्क्यांवर आला आहे. यामुळे पुढील चार महिने मुंबईकरांना पुरेसा पाणीपुरवठा करणे पालिकेला शक्य होणार आहे.उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी अशा सात धरणातून मुंबईला दररोज ३,८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. १ ऑक्टोबर रोजी सातही तलावातील पाणीसाठा १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटरवर पोहोचल्यानंतर मुंबईकरांना वर्षभर पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करणे शक्य होते. तसेच तलावातील उपलब्ध पाणीसाठा ३१ जुलैपर्यंत पुरेल या दृष्टीने पालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे नियोजन केले जाते. तलाव पूर्ण क्षमतेने भरले नाहीत तर पाणीकपात करण्याची वेळ येते. या वर्षी अजून तरी पाणीकपातीची शक्यता नसली तरी जून व जुलैमध्ये किती पाऊस पडतो त्यावर ते अवलंबून आहे. त्यामुळे मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन जल अभियंता विभागातील अधिकाऱ्यांनी केले आहे.
धरण साठा (२०२२) साठा (२०२१)उर्ध्व वैतरणा ३४.९० टक्के. ४४.५० टक्केमोडक सागर ५०.३९ टक्के ३७.९४ टक्केतानसा ३२.३५ टक्के २६.१२ टक्केमध्य वैतरणा ३९.८८ टक्के २३.६८ टक्केभातसा ४२.१३ टक्के ३९.४७ टक्केविहार ३६.५८ टक्के ५४.५१टक्केतुळशी ४९.७९ टक्के ५१.७७ टक्के
पाणीपुरवठय़ाची मार्चअखेरची स्थिती२९ मार्च २०२२ ५ लाख ८४ हजार ५८० दशलक्ष लिटर ४०.३९ टक्के२९ मार्च २०२१ ५ लाख ३५ हजार ९७३ दशलक्ष लिटर ३७.०३ टक्के२९ मार्च २०२० ५ लाख ७४ हजार ९१६ दशलक्ष लिटर ३९.७२ टक्के