श्री शि. वि. प्र. संस्थेच्या कै. क. डॉ.पां. रा. घोगरे विज्ञान महाविद्यालयात क. ब. चौ. उमवि विद्यार्थी विकास विभाग व युवती सभेतर्फे व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यात विविध महाविद्यालयातील प्राध्यापिका व विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.
प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा विद्यार्थी विकास समन्वयक डॉ. हसिम शेख उपस्थित होते.कार्यशाळेचे उद् घाटन मा. संगीता राऊत, सहा. पोलीस निरीक्षक शहर वाहतूक विभाग, धुळे यांच्या हस्ते झाले .धाडसी असणे अन्यायाचा प्रतिकार करणे व विविध क्षेत्रात कौशल्याने यश संपादन करणे या व्यक्तिमत्व विकासाच्या पायऱ्या आहेत असे त्या म्हणाल्या. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात समन्वयक डॉ. रूपाली पाटील यांनी सांगितले की शिक्षणाबरोबरच संस्कार, मूल्य व नेतृत्वगुणांचा विकास व्हावा हाच व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचा उद्देश आहे. अध्यक्षिय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ.मनोहर पाटील म्हणाले की खरे व्यक्तिमत्व हे तुमच्या दिसणे व कपड्यांवरून नव्हे तर तुमच्या बोलणे , देहबोली, कर्तुत्व व कौशल्य यावरूनच घडते. प्रसिद्ध व्यक्तिमत्व घडण्यासाठी तुमच्याकडे ज्ञान ,क्षमता ,कौशल्य व उत्तम आरोग्य असले पाहिजे. कार्यक्रमास उपप्राचार्य प्राध्यापक के.एम. बोरसे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.आय.एस. अहिरराव उपस्थित होते. तसेच प्रा. डॉ. स्वाती बोरसेे, प्रा. सायली नंदन उपस्थित होत्या. या कार्यशाळेचे वक्ते अँड. चैतन्य भंडारी यांनी सायबर सुरक्षा या विषयावर मुलींना सायबर क्षेत्रातील गुन्हेगारीची जाणीव करून दिली ऑनलाईन व्यवहार करीत असताना आपली फसगत होऊ नये यासाठी कशी काळजी घेतली पाहिजे, सोशल मीडिया वरून मुलींना ब्लॅकमेल करणे व विविध ठिकाणी अनेक फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत या बाबतीत कसे सतर्क राहिले पाहिजे याचे मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात अँड. मिनल क्षिरसागर यांनी कायद्या सारख्या क्लिष्ट विषयावर अत्यंत विनोद पूर्ण खेळीमेळीच्या वातावरणात जन्मापासून तर थेट मरेपर्यंत कायद्याचे संरक्षण आहे. मुलींनी घाबरून न जाता आपण कायद्याचे संरक्षण घेतले पाहिजे. त्यासाठी पंख कवितेचे वाचन केले "पंखात आहे आभाळाची आस तू होऊ नकोस निराश " असा आशेचा किरण व मोलाचा संदेश दिला.तसेच स्त्री रोग तज्ञ डॉ. शीतल मॅडम यांनी मुलींना वयात येणे म्हणजे काय? मुलींच्या विविध आरोग्य समस्या, रक्ताची कमतरता, पोषक आहार, सुरक्षित मातृत्व व "आपले आरोग्य हाच आपला खरा दागिना "असा सल्ला दिला व मुलींचे आरोग्यविषयक समस्यांचे शंका निरसन केले.दर्शना राजपूत, चारु लुल्ला, पायल गोंदवाणी, व किर्ती मराठे या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केलेे. तसेच विविध महाविद्यालयातून आलेल्या समन्वयक सपकाळे मॅडम, सोनिया शर्मा मॅडम व राजेश्वरी खंडलाय मॅडम यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. कु. दिव्या साबळे या विद्यार्थिनीने स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अश्विनी पाटील , परिचय डॉ. ज्योती ढोले ,डॉ. अर्चना चौधरी व आभार प्रदर्शन प्रा. वैशाली पाटील यांनी केले या कार्यशाळेत एकूण ७० मुलींनी सहभाग नोंदवला.
प्रतिनिधी : चेतन सोनवणे