धुळे :- महाराष्ट्र नाभिक आरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री.शिवदास फुलवळकर सर यांच्या उपस्थितीत धुळे येथे १५ /०४/२०२२ रोजी बैठक संपन्न झाली.या बैठकीत प्रभारी अध्यक्ष धनराज सोनवणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा संस्थापक अध्यक्ष श्री.शिवदास फुलवळकर सर यांच्या कडे सुपुर्द केला.नवीन प्रदेशाध्यक्षपदासाठी दादासाहेब काळे ( प्रदेश उपाध्यक्ष) यांनी किशोर गाडेकर बीड यांचे नाव सुचविले यास उपस्थित सर्व पदाधिकारी व मान्यवरांनी अनुमोदन दिले.
या निवडीनंतर किशोर गाडेकर यांचे उपस्थितीत पदाधिकारी व मुकटी येथील सोनवणे परिवाराच्या वतीने शाल,श्रीफळ, पुष्पहार,फेटा बांधुन सत्कार करण्यात आला.व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.या वेळी संस्थापक अध्यक्ष श्री.शिवदास फुलवळकर सर,माजी अध्यक्ष धनराजजी सोनवणे, महाराष्ट्र उपाध्यक्ष दादासाहेब काळे, महाराष्ट्र संघटक संजय भाऊ चौधरी, नितीनभाऊ क्षीरसागर, संतोषजी खंडागळे चेतन सोनवणे यांच्यासह आरक्षण समिती चे मान्यवर उपस्थित होते.
प्रतिनिधी : चेतन सोनवणे