धुळे - येथील श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे कै. कर्मवीर डॉ. पा.रा. घोगरे विज्ञान महाविद्यालयास महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा राष्ट्रीय सेवा योजने चा सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार प्राप्त झाला. तसेच महाविद्यालयातील प्रा. डॉ. दत्ता ढाले यांना सर्वोत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी हा पुरस्कार देऊन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार श्री उदय सामंत यांच्या हस्ते मुंबई येथे गौरविण्यात आले. या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख पाच हजार रुपये असे होते.पुरस्कार स्विकारतांना महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.डॉ.एम.व्ही.पाटील व प्रा.डॉ.दत्ता ढाले सर.
प्रतिनिधी : चेतन सोनवणे ( धुळे )