सोलापूर मध्ये मालवाहतूक करणाऱ्या रेल्व्हेचा अपघात

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातल्या केम  गावाजवळ मालवाहतूक करणाऱ्या रेल्वेचा अपघात झाला होता. मालवाहू गाडीचे रेल्वे इंजिन थेट शेतात घुसल्याचे पाहायला मिळालं. आज सकाळच्या सुमारास केम या गावाजवळील शेतात सिमेंट भरलेल्या रेल्वेचे इंजिन रूळ सोडून थेट शेतात घुसले.सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र मालगाडीचं नुकसान झालं. मालगाडीचे डबेही रेल्वे रुळावरुन घसरल्याचं पाहायला मिळालंय. 

सुदैवाने शेतात लोकवस्ती किंवा व्यक्ती नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र रेल्वे इंजिन रुळावरून खाली घसरल्याने काही रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक बिघडले आहे. आता ही रेल्वे वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्नही सुरु आहेत.


Comments : 0


    No Comments

Leave a comment