शस्त्रक्रियेनंतर कडाक्याच्या थंडीत स्तनदा मातांना फरशीवर झोपवले
त्र्यंबकेश्वर तालुक्यात ठाणापाडा आणि शिरसगाव या आरोग्य केंद्रांवर अत्यंत संतापजनक घटना . कुटुंब नियोजनाचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी शस्त्रक्रिया केलेल्या स्तनदा मातांना कडाक्याच्या थंडीत रूग्णालयात फरशीवर झोपवण्याचा प्रकार उघड झाला आहे.
शिरसगाव आरोग्य केंद्रात चाळीसहून अधिक शस्त्रक्रिया केलेल्या स्तनदा महिलांना चक्क थंडगार फरशीवर झोपविण्यात आले असून, अत्यावश्यक सेवेची कोणतीही सोय नसताना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने हा धक्कादायक प्रकार केला.
कुटुंब नियोजनाचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी या स्तनदा मातांच्या जिवाशी खेळ कऱण्याचा संतापजनक प्रकार करण्यात आला असून दिवसभर या महिलांकडे कोणी नंतर लक्ष दिले नसल्याने जिल्हा परिषद सदस्य रुपाली माळेकर यांनी आरोग्य विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत.