नाशिक : पाच दिवसांच्या चिमुकल्याला श्वास घेण्यास होणारा त्रास त्यातच खासगी रुग्णालयांमध्ये येणारा भरमसाठ खर्च, यामुळे अखेर नाईलाज म्हणून पालकांनी बाळास जिल्हा रुग्णालयात दाखल के ल्यावर डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करुन ३४ दिवस उपचार करीत बाळाला जीवदान दिले. जिल्हा रुग्णालयाविषयी असणारी प्रतिमा पुसून अभिमानाने पालक भावनाशील झाले. रुग्णालयातून बाहेर पडतांना त्यांचे डोळे भरून आले..
सरकारी रुग्णालय म्हटल्यावर डोळ्यांसमोर वेगळी प्रतिमा उभी राहते. करोना काळात ही प्रतिमा पुसण्याचे काम बऱ्यापैकी झाले. करोना संसर्गाच्या काळात पहिल्याच टप्प्यात येथील जिल्हा रुग्णालय हे करोना रुग्णालय झाले. रुग्णालयात जिल्ह्य़ातून येणाऱ्या गरोदर मातांना करोना संसर्ग होऊ नये, यासाठी व्यवस्था करण्यात आली. करोनाग्रस्त गरोदर मातांसाठीही वेगळा कक्ष तयार झाला. कळोना काळात आरोग्य यंत्रणा करोनाविरोधातील उपाययोजनांवर केंद्रीत झालेली असतांना करोनाबाह्य़ आजार असलेल्या रुग्णांवरही उपचारासाठी जिल्हा रुग्णालय धडपडत राहिले.
जिल्हा रुग्णालयात १० एप्रिल रोजी मुस्कान शेख या महिलेची प्रसुती शस्त्रक्रि येने झाली. मुस्कान आणि तिच्या बाळाला पाच दिवसात घरी सोडण्यात आले. घरी गेल्यानंतर बाळाला चारच दिवसात श्वास घेण्यास अडचण येऊ लागली. घाबरलेल्या शेख कुटूंबियांनी खासगी रुग्णालयात धाव घेतली. परंतु, खासगी रुग्णालयात दिवसाला येणारा सात हजारपेक्षा अधिक रुपयांचा खर्च पाहता त्यांनी जिल्हा रुग्णालयात जाणे पसंत केले. जिल्हा रुग्णालयात बाळाची तपासणी करुन त्याला तातडीने बालकांच्या अतिदक्षता कक्षात दाखल करण्यात आले.
बालरोगतज्ज्ञ डॉ. सुप्रिया, डॉ. ठाकूर आणि परिचारिकांनी बाळाची दिवसरात्र काळजी घेतली. बालकाला फु फ्फु सात झालेला संसर्ग पाहता त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. प्रकृतीत काहीशी सुधारणा झाल्यावर चिमुकल्याला आईच्या शीत देतांना कांगारू मदर युनिटची माहिती देण्यात आली. आईची कुशी आणि दूध, डॉक्टरांचे लक्ष यामुळे ३४ दिवसानंतर चिमुकला पूर्णपणे बरा होऊन गुरूवारी आपल्या घरी परतला.