नाशिक : भारतीय जैन संघटना आणि कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच नाशिक महापालिका यांच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात करोनाचा संसर्ग लक्षात घेता ‘स्मार्ट हेल्मेटद्वारे मास स्क्रीनिंग’ या उपक्रमास सुरुवात करण्यात आली.
महापालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा उपनिबंधक सतीश खरे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती देविदास पिंगळे, बीजेएस मिशन झिरो प्रकल्प संचालक नंदकिशोर साखला आणि अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. करोनाच्या कठीण काळात आरोग्य आणि अर्थचक्र सुरु राहण्यासाठी प्रशासन टप्प्याटप्प्याने शिथीलकरण प्रक्रिया राबवित आहे. र्निबध शिथील होत असल्याने बाजारपेठ, भाजी बाजार समितीमध्ये गर्दी मोठय़ा प्रमाणावर होत आहे. ही गर्दी करोनाला नियंत्रण देणारी ठरू नये यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन सार्वजनिक ठिकाणी शारीरिक तापमान जास्त असलेल्या व्यक्तींना स्मार्ट हेल्मेट द्वारे शोधण्यात येत आहे.