नाशिकः नाशिकसह (Nashik) आठ आदिवासी जिल्ह्यांमध्ये पद भरती (Recruitment reservation) आरक्षण लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या (CM) अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. (Recruitment reservation in eight tribal districts including Nashik)
पदभरती आरक्षण आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये लागू होणार आहे. या जिल्ह्यांमध्ये रायगड, नाशिक, धुळे, नंदूरबार, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली यांचा समावेश आहे. पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार या चार जिल्ह्यांमध्ये अनु. जाती 10 टक्के, अनु. जमाती 22 टक्के, विजा-अ 3 टक्के, भज-ब 2.5 टक्के, भज-क 3.5 टक्के, भज-ड 2 टक्के, विमाप्र 2 टक्के, इमाव 15 टक्के, ईडब्ल्यूएस 10 टक्के आणि खुला 30 टक्के लागू असेल.
यवतमाळ जिल्हा
यवतमाळ जिल्ह्यामध्ये अनु. जाती 12 टक्के, अनु. जमाती 14 टक्के, विजा-अ 3 टक्के, भज-ब 2.5 टक्के, भज-क 3.5 टक्के, भज-ड 2 टक्के, विमाप्र 2 टक्के, इमाव 17 टक्के, ईडब्ल्यूएस 10 टक्के आणि खुला 34 टक्के.
चंद्रपूर जिल्हा
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अनु. जाती 13 टक्के, अनु. जमाती 15 टक्के, विजा-अ 3 टक्के, भज-ब 2.52 टक्के, भज-क 3.5 टक्के, भज-ड 1 टक्के, विमाप्र 2 टक्के, इमाव 19 टक्के, ईडब्ल्यूएस 10 टक्के, आणि खुला 30 टक्के.
गडचिरोली जिल्हा
गडचिरोली जिल्ह्यामध्ये अनु. जाती 12 टक्के, अनु. जमाती 24 टक्के, विजा-अ 3 टक्के, इमाव 17 टक्के, ईडब्ल्यूएस 10 टक्के आणि खुला 24 टक्के.
रायगड जिल्हा
रायगड जिल्ह्यामध्ये अनु.जाती 12 टक्के,अनु.जमाती 9 टक्के, विजा-अ 3 टक्के, भज-ब 2.5 टक्के,भज-क 3.5 टक्के, भज-ड 2 टक्के, विमाप्र 2 टक्के, इमाव 19 टक्के, ईडब्ल्यूएस 10 टक्के आणि खुला 37 टक्के.
अध्यादेश काढणार
दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने ओबीसी आरक्षणाशिवाय पाच जिल्हा परिषदेतील निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. त्यामुळे अडचणी निर्माण झालेल्या असतानाच राज्य सरकारने ओबीसी आरक्षणासाठी अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला आहे. अध्यादेश काढल्यानंतर राज्यातील ओबीसींना काही ठिकाणी 27 टक्के, काही ठिकाणी 20 टक्के आणि काही ठिकाणी 4 टक्के आरक्षण राहील. तेवढं मिळेल. एकूण 10-12 टक्के जागा कमी होईल. सर्वच जागा कमी होण्यापेक्षा 10-12 टक्के जागा कमी झाल्या तरी हरकत नाही. पण 90 टक्के जागा वाचणार आहेत.
कुठे किती टक्के आरक्षण राहणार
8 जिल्ह्यातील नोकरीमधील आरक्षण कमी झालं होतं. आम्ही एक फॉर्म्युला ठेवला आहे. त्यानुसार हे आरक्षण आता पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार येथे 15 टक्के, यवतमाळमध्ये 17 टक्के, गडचिरोलीत 17 टक्के, चंद्रपूरमध्ये 19 टक्के, रायगडमध्ये 19 टक्के आरक्षण राहील. बाकी ठिकाणी 27 टक्के असेल, असं अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं.