नाशिकः नाशिकमध्ये पहिल्यांदाच UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) तर्फे नागरी सेवा पूर्व परीक्षा 2021 घेण्यात येत आहे. परीक्षेसाठी शहरातील 10 केंद्रावर 3445 विद्यार्थी आज रविवारी आपले भविष्य आजमावणार आहेत.
प्रशासनातर्फे UPSC परीक्षेची जोरात तयारी करण्यात आली आहे. त्यासाठी 480 अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आयोगाच्या सूचनेनुसार सर्व केंद्रावर तयारी करण्यात आली आहे. परीक्षेसाठी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परीक्षेत सकाळी 9:30 ते 11:30 या दरम्यान पहिला पेपर, तर तर दुपारी 2:30 ते 4:30 या दरम्यान दुसरा पेपर होणार आहे. यावेळी कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे.
शहरातील मराठा हायस्कूलची जुनी आणि नवी इमारत, बिटको हायस्कूल, केव्हीएन नाईक महाविद्यालय, रचना महाविद्यालय, एचपीटी महाविद्यालय या ठिकाणी ही परीक्षा होत आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची परीक्षा समन्वयक आणि महापालिका आयुक्त कैलास जाधव यांची राज्य निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
परीक्षेदरम्यान जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त सर्व परीक्षा केंद्रांना भेटी देऊन पाहणी करणार आहेत. सोबतच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नियमाचे विद्यार्थी आणि प्रशासनाने काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा