नवी मुंबई : नवी मुंबई शहरात मागील काही दिवसांपासून चांगला पाऊस पडत असून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरण परिसरात शहरापेक्षा अधिक पाऊस झाला आहे. शहरात २२८६.४६ तर मोरबे धरण परिसरात २९१४.८० मिलीमीरटर पावसाची नोंद झाली आहे. तरीही अद्याप धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नाही, मात्र गेली दोन दिवस होत असलेल्या संततधार पावसामुळे धरण भरण्याची शक्यता वाढली आहे.
धरणात सद्या ८५ टक्के पाणीसाठा झाला असून भरण्यासाठी अद्याप ८०० मिलीमीटर पावसाची आवश्यकता आहे. गेल्या वर्षी मोरबे धरण भरले नव्हते. त्यापूर्वी सलग तीन वर्ष धरण भरले होते.
यावर्षी पावसाळ्यापूर्वी मोरबेचा पाणीसाठी खूप कमी झाला होता. त्यामुळे पाणीकपातीचा प्रश्न निर्माण झाला होता. जुलैमध्ये झालेल्या दमदार पावसाने धरणात चांगला साठा झाला. तर ऑगस्ट महिन्यातही मागील आठवडाभरापासून पाऊस होत आहे. आतापर्यंत २,९१४ मिलीमीटर पाऊस झाल्याने धरणाची पातळी ८५ मीटपर्यंत गेली आहे. धरण भरण्यासाठी तीन मीटरची गरज असून ८०० मिलीमीटर पावसाची गरज आहे. धरणाची पाणी साठवण्याची क्षमता १९०.८९० दशलक्ष घनमीटर एवढी असून धरण ८८ मीटर पातळीला पूर्ण भरते.
सलग तीन वर्ष
२०१७ ते २०१९ सलग तीन वर्ष पूर्ण क्षमतेने भरले होते. तसेच धरण परिसरात मागील ९८ वर्षांनंतर प्रथमच २०१९ मध्ये जवळजवळ ५००० मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली होती. मागील वर्षी धरण भरले नव्हते.
धरण क्षमता
मोरबे धरण परिसरातील पाऊस (मिलीमीटरमध्ये)
नवी मुंबई शहर हे मोरबे धरणामुळे
जलसंपन्न आहे. मोरबे धरणात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस झाला असून ८५ टक्के धरण भरले आहे. धरण भरण्यासाठी अजून ८०० मिलीमीटर पावसाची आवश्यकता आहे.