भारताचे सीडीएस बिपिन रावत (BIpin Rawat) यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले आहे. हवाई दलाने याबाबतची माहिती दिली आहे.
अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमधून १४ जण प्रवास करत होते.. या अपघाताच चौकशी करण्याचे आदेश हवाई दलाने दिले आहेत.
लष्कराचं IAF Mi-17V5 हेलिकॉप्टर होते अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून जनरल बिपिन रावत यांनी कार्यभार स्विकारला होता.
15 ऑगस्ट 2019 रोजी भारताच्या 73 व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संरक्षण दलांना बळकटी देण्यासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पद तयार करण्यात येणार असल्याचे सांगितले होते.
संरक्षण दलांना बळकटी देण्यासाठी आणि तिन्ही दलांमध्ये योग्य समन्वय आखण्यासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे पद निर्माण केलं गेलं होतं.
1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धानंतर सैन्य दलांमध्ये योग्य समन्वय राखला जावा यासाठी असा प्रकारचे पद निर्माण करण्याची शिफारस करण्यात आली होती. 31 डिसेंबर 2019 रोजी भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून जनरल बिपिन रावत यांनी कार्यभार स्विकारला होता.
यापूर्वी भारताचे २६वे लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती झालेल्या रावत सप्टेंबर २०१६ मध्ये जबाबदारी स्वीकारली होती.
२०१६ मध्ये लष्कराचे उपमुख्याधिकारी म्हणून तोपर्यंत ते लष्कराचे उपमुख्याधिकारी म्हणून आणि त्यापूर्वी ते पुण्यातील सदर्न कमांडचे GOC इन कमांड होते.
लेफ्टनंट जनरल रावत डिसेंबर १९७८ मध्ये सैन्यात दाखल झाले. '११ गोरखा रायफल्स'च्या पाचव्या तुकडीतून त्यांनी लष्करी सेवेला सुरुवात केली होती.
१९८६ मध्ये चीनला लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर त्यांनी पायदळाची धुरा संभाळली होती .
लष्करी सेवा बजावताना अनेक आव्हानांचा त्यांनी समर्थपणे मुकाबला केला.
उत्तरेत लष्कराची फेरबांधणी करण्याचं काम त्यांच्या नेतृत्वाखाली झाले.
वाढता दहशतवाद, छुपं युद्ध व ईशान्येतील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांची नियुक्ती महत्त्वाची होती.
राष्ट्रीय रायफल्स आणि काश्मीर खोऱ्यात लष्करी तुकडीचं नेतृत्व केले.
भारतीय लष्करात ब्रिगेडपदी असताना रावत यांनी काँगो येथे संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतता मोहिमेच्या बहुराष्ट्रीय ब्रिगेडचे नेतृत्व केले.