नागपूरः मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पातील सिवनी जंगलातील कॉलरवाली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाघिणीचा अखेर मृत्यू झाला. शनिवारी संध्याकाळी जंगलात अधिकाऱ्यांना ती मृतावस्थेत आढळली. 2008 ते 2019 या 11 वर्षांच्या काळात तिने तब्बल 29 बछड्यांना जन्म दिला. टी 15 तसेच पेंचची राणी या नावानेही प्रसिद्ध असलेल्या या वाघिणीचा वयाच्या 17 व्या वर्षी मृत्यू झाला. तसे तर ती वृद्धावस्थेत पोहोचली होती, मात्र एका सवयीमुळे तिचे आरोग्य बिघडले आणि शनिवारी तिचा मृत्यू झाला, असा अंदाज वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
14 जानेवारी रोजी टिपलेले वाघिणीचे दृश्य
पेंच अभयारण्यातील या वाघिणीला 2008 साली देखरेखीसाठी देहरादूनच्या वाइल्ड लाइफ तज्ज्ञांनी तिला रेडिओ कॉलर लावला होता. त्यामुळे ती जंगलात तिला कॉलरवाली वाघीण म्हणूनच ओळखले जात होते. सध्या याच क्षेत्रात पाटदेवची T-4 ही वाघीण तिची मुलगी असून तीदेखील लोकप्रिय आहे.
वाघिणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले
मध्य प्रदेशचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुब्रमण्यम सेन यांनी सांगितले की, 2005 मध्ये या वाघिणीचा जन्म झाला होता. त्यानंतर तिची आई t-7 हिचे निधन झाले होते. 2008 ते 209 या काळात t-15 वाघीण 8 वेळा गरोगर राहिली. तिने 29 बछड्यांना जन्म दिला. या वन परिक्षेत्रात वाघांची संख्या वाढवण्यात तिची मोलाची भूमिका आहे. त्यामुळे जंगलात ती सुपर मॉम या नावानेही ओळखली जात होती.
कॉलरवाली विघाणीचे 14 जानेवारी रोजी अखेरचे दर्शन झाले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही वाघीण वार्धक्यामुळे क्षीण झाली होती. तसेच दोन-तीन दिवस जंगलात तिची हालचाल दिसून आली नाही. त्यामुळे पथकाने तिचा शोध सुरु केला. त्यानंतर ती घटनास्थळावर मृत अवस्थेत आढळली. दरम्यान, स्वतःचे शरीर चाटण्याच्या सवयीमुळे तिच्या पोटात केसांचा गोळा तयार झाला. आतड्यांत हा केसांचा गोळा फसल्याने तिचे निधन झाले असावे, असा अंदाज वनअधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.