अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या ३६ व्या जयंतीनिमित्त आपण त्याच्या आयुष्यातील अशा गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या खूप कमी लोकांना माहिती आहेत. (छायाचित्र – सुशांत सिंग राजपूत/फेसबूक)\
सुशांतचा जन्म २१ जानेवारी १९८६ रोजी बिहारमधील पाटणात झाला. तो आपल्या ५ भावंडांपैकी सर्वात लहान होता. तो १२ वीला असतानाच त्याच्या आईची मृत्यू झाला. (छायाचित्र – सुशांत सिंग राजपूत/फेसबूक)
सुशांतने आपल्या अभिनय क्षेत्रातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी इंजिनिअरिंगचं शिक्षण सोडलं. त्याने शैमक देवरकडून नृत्याचे धडे घेतले आणि बॅरी जॉन्स येथे अभिनयाचं शिक्षण घेतलं. (छायाचित्र – सुशांत सिंग राजपूत/फेसबूक)
२००६ मध्ये कॉमनवेल्थ गेम्सच्या कार्यक्रमात ऐश्वर्या रायने डान्स केला. त्यावेळी सुशांतने गर्दीत बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केलं. (छायाचित्र – सुशांत सिंग राजपूत/फेसबूक)
सुशांतला खगोलशास्त्रात प्रचंड रस होता. (छायाचित्र – सुशांत सिंग राजपूत/फेसबूक)
इतकंच नाही सुशांतने चंद्रावर जमिनीचा एक तुकडा देखील विकत घेतला होता. (छायाचित्र – सुशांत सिंग राजपूत/फेसबूक)
सुशांतने प्रचंड मेहनत घेतली आणि अखेर २०१३ मध्ये ‘काय पो चे’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रमुख भूमिकेत एन्ट्री केली. त्याने २०१० मध्ये राझ या चित्रपटात सहकलाकार म्हणूनही भूमिका केली होती. (छायाचित्र – सुशांत सिंग राजपूत/फेसबूक)
सुशांत राजपूत अमेरिकन सुपर मॉडेल केंडल जेनरसोबत मे २०१७ मध्ये वोगमध्ये (Vogue) झळकणारा एकमेवर बॉलिवूड कलाकार ठरला. (छायाचित्र – सुशांत सिंग राजपूत/फेसबूक)
सुशांत इंटरनॅशनल लुनार लँड रजिस्ट्रीचा ३ वर्षे सदस्य होता. त्याने फ्रान्सच्या आंतरराष्ट्रीय अंतराळ विद्यापीठाला भेट देण्याचंही ठरवलं होतं. (छायाचित्र – सुशांत सिंग राजपूत/फेसबूक)
मृत्यूच्या आधी सुशांत गिटार क्लासेस करत होता. तो आपल्या भूमिकांसाठी देखील प्रचंड मेहनत घेत होता. (छायाचित्र – सुशांत सिंग राजपूत/फेसबूक