राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे महाराष्ट्राच्याच नाही तर राष्ट्रीय राजकारणातील मोठं व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. अनेकदा आपल्या राजकीय भुमिकांसाठी तसेच मतांसाठी ते बातम्यांमध्ये आणि सोशल मीडियावर चर्चेत असतात.
सध्या पवार आणि त्यांचे कुटुंबिय वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहेत. हे कारण आहे, शरद पवार यांचा नातू आणि अजित पवार यांचा मुलगा जय पवार.
झालंय असं की जय पवार यांचा एक फोटो व्हायरल झालाय.
या फोटोमध्ये शरद पवारांचे नातू आणि अजित पवारांचे धाकडे पुत्र जय पवार हे लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबत दिसत आहेत.
उर्वशी आणि जय पवार यांचा तो फोटो ‘सिने रेझर ऑफिशिएल’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. मात्र यापूर्वही जय यांचे थोरले बंधू पार्थ पवार यांचेही काही फोटो व्हायरल झाले होते.
नेमका तो फोटो कशासंदर्भात होता आणि अजित पवार काय म्हणाले होते हे आपण जाणून घेऊच पण त्याआधी सध्या चर्चेत असणारे जय पवार कोण आहेत हे पाहूयात…
व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये उर्वशी, जयसोबत आणखी एक व्यक्ती आहे. हा दुबईतील व्यावसायिक आहे. हा फोटो दुबईच्या बुर्ज-अल-अरब येथील असल्याचा दावा केला जात आहे. त्या फोटोची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
उर्वशी आणि जय पवार यांचा तो फोटो ‘सिने रेझर ऑफिशिएल’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. हा फोटो नेमका कधीचा आहे? जय उर्वशीला डेट तर करत नाही ना? असे प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केले होते.
जय हे बारामतीतील राजकारणात अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत विशेष सक्रीय होते. मात्र नंतर त्यांनी राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.
अजित पवार यांचे ज्येष्ठ पुत्र पार्थ पवार यांच्यासह जय पवार प्रचारसभांना हजेरी लावयाचे. त्यांचे काही फोटो सोशल मीडियावरही व्हायरल झालेले. त्याचवेळी त्यांनी भविष्यात निवडणूक लढवण्याची इच्छा नसल्याचे सांगितले होते.
२०१९ मध्ये बारामती विधानसभा निवडणूकीसाठी अवघं पवार कुटुंब पिंपरी-चिंचवड शहरात ठाण मांडून बसले होते. मात्र याचवेळी त्यांनी आपण पक्ष प्रवेश केला तरी सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे काम करु असं सांगितलेलं. पण नंतर ते राजकारणापासून दूर गेले.
जय हे राजकारणापासून दूर असले तरी त्यांचे बंधू पार्थ यांनी २०१९ मध्ये विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा पराभव झाला होता. या पराभवानंतर पार्थ पवार हे कायमच चर्चेत राहिले.
पार्थ पवार हे २०१९ पासून या ना त्या कारणाने चर्चेत आहेत.
कधी त्यांचे दिवाळीच्या वेळेचे ठाकरे कुटुंबासोबतचे फोटो तर कधी मावळ मतदरासंघांमध्ये एखाद्या कार्यक्रमाला हजेरी अशा गोष्टींमुळे पार्थ चर्चेत असतात.
मध्यंतरी शरद पवार यांनी पार्थ यांच्या वक्तव्याला फार किंमत नाही असं म्हटलं होतं म्हणून पार्थ चर्चेत होते.
कधी राम मंदिराचा मुद्दा तर कधी इतर मुद्द्यावरुन त्यांची मत ही पक्षाच्या विचारांपेक्षा वेगळी असल्याने पार्थ पवार चर्चेत रहिले.
पण अन्य एका कारणासाठी पार्थ पवार चर्चेत होते ते सिंगापूरमधील कथित फोटोंमुळे. पार्थ पवार यांना आणण्यासाठी सिंगापूरहून विशेष विमान आल्याचे फोटो २०२० मध्ये प्रचंड व्हायरल झालेले.
या फोटोंबद्दल २० मार्च २०२० रोजी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये करोनासंदर्भातील निर्बंधांमध्ये वाढ करण्यात आल्याची माहिती अजित पवार यांनी दिली होती.
मात्र त्यानंतर त्यांना पत्रकारांनी पार्थ यांच्या त्या व्हायरल फोटोंबद्दल छेडले असता त्यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलेलं.
एका पत्रकाराने अजित पवारांना पार्थ पवार सिंगापूर येथून सुखरुप पोहोचले का असं विचारलं असता अजित पवारांनी सांगितलं जरा जोर देतच प्रश्नाला उत्तर दिलं होतं.
“तो कधीच सिंगापूरला गेला नव्हता. काही लोक चुकीच्या बातम्या सांगतात.,” असं अजित पवार म्हणाले होते.
“तुम्हाला हवं तर त्याचा पासपोर्ट दाखवतो. माझ्या माहितीप्रमाणे गेल्या तीन चार महिन्यात तो काही सिंगापूरला गेलेला नाही,” असंही अजित पवार म्हणाले होते.
यावर पत्रकारांनी अजून प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला असता, “आता मीच त्याचा बाप सांगतोय ना…पासपोर्ट दाखवायचीही माझी तयारी आहे” असं आपल्या गावरान शैलीत थोड्या चढ्या आवाजात उत्तर दिलेलं.
अजित पवारांनी एखाद्या सामान्य व्यक्तीप्रमाणे आपल्या मुलाबद्दलच ज्या पद्धतीने ही माहिती दिली ती शैली पाहून पत्रकारांना एकच हसू फुटलं होतं. पार्थ पवार यांचा हा फोटो खोटा असल्याची माहिती नंतर समोर आलेली. (सर्व फोटो सोशल मीडिया आणि पीटीआयवरुन साभार