मराठा आरक्षणासाठी भाजपा सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचं पुन्हा एकदा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ते आज (सोमवार) पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या विविध विषयांवरील प्रश्नांवर प्रतिक्रिया दिली. काही दिवसांपूर्वी संभाजीराजेंनी, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चार वेळेला पत्र पाठवले. पण त्यांनी अद्याप मला भेटीसाठी वेळ दिलेली नाही. असं म्हणत नाराजी व्यक्त केली होती? याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, संभाजीराजेंनी विविध विषयांवर जेव्हा पंतप्रधान मोदींची भेट मागितली असेल, तेव्हा ती त्यावेळी नक्कीच मिळाली असेल. मराठा आरक्षणाचा विषय पंतप्रधान मोदींच्या हातात नाही. हा विषय राज्यांच्या सूचीमध्ये आहे.
तसेच, करोनाचा विचार करून वेगवेगळ्या स्वरूपात दहावी, बारावीची परीक्षा झालीच पाहिजे. असं म्हणत, सध्या हम करे सो कायदा असं सरकारचं धोरण आहे. अशी टीका देखील यावेळी चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर केली.