pune : चालू आर्थिक वर्षात मिळकतकरातून दोन महिन्यांत ४५० कोटींचे उत्पन्न महापालिके च्या तिजोरीत जमा झाले आहे. गेल्या वर्षी २२ मे पर्यंत १९६ कोटी रुपयांचे उत्पन्न महापालिके ला मिळाले होते. यंदा ते २५४ कोटींनी अधिक असल्याची माहिती कर आकारणी आणि कर संकलन विभागाकडून देण्यात आली. दरम्यान, सवलतीमध्ये कर भरणा करण्यासाठी शेवटचे सहा दिवस बाकी आहेत.
दरवर्षी १ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत मिळकतकर भरणाऱ्यांना सर्वसाधारण करात १० ते १५ टक्क्यांची सवलत देण्यात येते. शहरात ११ लाख मिळकतींची नोंद आहे. कर विभागाकडून शहरातील मिळकतधारकांना टपाल आणि ऑनलाइन पद्धतीने देयकांचे वाटप करण्यात आले होते. १ एप्रिल या पहिल्याच दिवशी सुमारे ४ कोटींचे उत्पन्न पुणेकरांनी तिजोरीत जमा के ले होते. यंदा टाळेबंदी सुरू झाल्याने मिळकतकर जमा होण्याबाबत संदिग्धता होती मात्र पुणेकरांनी मिळकतकर भरण्यात आघाडी घेतली आहे.
गेल्या वर्षी २२ मे अखेरपर्यंत १९६ कोटी रुपये जमा झाले होते. यंदा याच दिवसापर्यंत ४५० कोटी रुपये जमा झाले आहेत. मे अखेरपर्यंत मिळकतकरातून किमान ५०० कोटी रुपये जमा होतील, असा अंदाज आहे. दरम्यान, टाळेबंदीमुळे सवलतीमध्ये मिळकतकर भरण्यासाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. नगरसेवकांकडून तशी मागणी करण्यात आली आहे. गेल्या वर्षीही सवलतीमध्ये कर भरण्यास ३० जून पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली होती.