मुंबई : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या विरुद्ध गेल्या पाच महिन्यांमध्ये महाराष्ट्र ट्रॅफिक विभागाकडून मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आले आहेत. ज्यामध्ये हेल्मेट न घालणाऱ्यांकडून आतापर्यंत 80 कोटी दंड वसूल करण्यात आले आहेत. या मध्ये हेल्मेट न घालण्या मध्ये पुणेकर प्रथम तर मुंबईकर दुसऱ्या क्रमांकावर आहेत..
दुचाकी चालवत असताना जर कधी अपघात झाला तर त्यामध्ये जीव वाचावा म्हणून हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. मात्र हेल्मेट घालणं काहींना त्यांच्या शानच्या विरोधात वाटतं आणि अशा लोकांमध्ये पुणेकर पहिल्या तर मुंबईकर दुसऱ्या क्रमांकावर आहेत. जानेवारीपासून ते मे पर्यंत महाराष्ट्र हायवे ट्राफिक विभागाकडून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांन विरुद्ध कारवाई करण्यात आली. त्यामध्येच दुचाकी चालवताना हेल्मेट न घालणाऱ्यांचा सुद्धा समावेश होता. या मध्ये पहिल्या 5 महिन्यात 16.15 लाख लोकांना लोकांवर विना हेल्मेट गाडी चालवणे संदर्भात दंड आकारण्यात आले आहेत आणि यांच्याकडून 80 कोटी रुपये दंड म्हणून वसूल करण्यात आले आहेत.
यामध्ये सर्वधिक कारवाया या पुण्यात झाल्या आहेत. पुण्यामध्ये 7.45 लाख लोकांवर दंड आकारण्यात आले आहे तर मुंबईमध्ये ही संख्या 3.9 लाखांवर आहे. तर ठाण्यात 78,346 लोकांवर दंड आकरण्यात आले आहेत आणि म्हणूनच लोकांनी जास्तीत जास्त नियमांचे पालन करण्याचे आवाहन महाराष्ट्र ट्राफिक हायवे विभागाचे एडीजे भूषण उपाध्याय यांच्याकडून करण्यात आला आहे.
महाराष्ट्र हायवे ट्राफिक विभागाकडून फक्त दहा शहरांचे आकडे जाहीर करण्यात आले आहेत त्यामुळे ही संख्या आहे त्यामध्ये अजूनही प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. इतकंच नाही तर बाइक चालवताना हेल्मेट खालणे हे बंधनकारक आहे मात्र तरीसुद्धा बहुतांश लोकांना बाईक चालवताना हेल्मेट घालणे हा महत्त्वाचा भाग वाटत नाही. ज्यासाठी त्यांच्याकडे विविध कारणे तयार असतात.
2020 मध्ये महाराष्ट्र मध्ये 4878 लोकांचे जीव दुचाकी अपघातात गेले होते या मध्ये 1510 त्यांचे जीव गेले जे पाठी बसले होते.या मध्ये बहुतांश लोकांनी हेल्मेट घातले नव्हते.