इंदापूर : अनेक तरुण विदेशात शिक्षणासाठी जातात आणि तिकडेच स्थायिक होतात. परंतु, इंदापूर तालुक्यातील अंगद शहा याला अपवाद ठरले आहेत. अंगद शहा हे शिक्षणासाठी परदेशात गेले. शिक्षण झाल्यानंतर तिथेच नोकरीही लागली. मात्र, मागच्या वर्षी कोरोना काळात भारतात परतले आणि त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. अंगद यांनी 7 एकरावर जिरेनियमची लागवड केलीय. सोबतच अंगद यांनी जिरेनियम तेलाचा प्लांट उभा केलाय. त्या तेलाला बाजार पेठेत मोठी मागणी आहे.
अंगद शहा हा तरुण उच्च शिक्षित असून वय अवघं 26 वर्ष आहे. होय अंगद याचं एमबीए झालंय ते देखील परदेशात. तरी देखील अंगदने शेती करण्याचं ठरवलंय. मागच्या वर्षी कोरोना काळात भारतात आला आणि इथंच लॉकडाऊनमध्ये अडकला. त्यातच त्याला शेतीची आवड निर्माण झाली.
अंगदने सुरुवातीला शेतीत पारंपरिक पिके घेतली. त्यानंतर तो जिरेनियम या सुगंधी वनस्पतीकडे वळला. जिरेनियम हे कमी खर्चात आणि कमी पाण्यात जास्त पैसे देणार पीक आहे. आता 7 एकरावर त्याने जिरेनियम पिकाची लागवड केलीय. तसेच त्याने जिरेनियममध्ये आंतरपीक म्हणून सीताफळ आणि गवारीचे पीक घेतलं आहे.
अंगद यांचा वडिलोपार्जित कापडाचा व्यवसाय आहे. वडिलोपार्जित व्यवसाय न करता अंगदने वेगळी वाट चोखळली आहे. त्यामुळे विदेशात शिकून देखील त्याने शेती करणं पसंद केलं. अंगदच्या या निर्णयाच कुटुंबियांना अभिमान आहे..
जिरेनियम तेलाचा वापर हा सौंदर्य प्रसादाने बनवण्यासाठी केला जातो. कॉस्मॅटिक्समधून जो सुगंधी वास येतो तो जिरेनियम तेलाचा असतो. जिरेनियमचे आरोग्यासाठी देखील मोठे फायदे आहेत. भारतात जिरेनियम तेलाला मोठी मागणी आहे. देशात वर्षाला 100 टनापेक्षा जास्त तेल आयात केले जाते असे जाणकार सांगतात. यावरुन याची मागणी किती मोठी आहे हे लक्षात येते.
एक एकर जिरेनियम लागवडीसाठी सरासरी 80 हजार रुपये खर्च आला. एका एकरातून दरवर्षी अंगदला 40 टन उत्पन्न अपेक्षित आहे. एक टन जिरेनियममधून 1 लिटर तेल मिळते. एका लिटर तेलाची किंमत 10 ते 20 हजारापर्यंत आहे. एका एकरातून त्याला वर्षाकाठी 40 लिटर तेल मिळते तर 7 एकरातून वर्षाला 280 लिटर तेल अपेक्षित आहे. तसेच त्याने तेल काढण्यासाठी प्लांट देखील उभारला आहे.
उच्च शिक्षण भारताबाहेर घेऊन देखील अंगदने शेती करण्याचा निर्णय घेतलाय. काहींनी त्याला वेड्यात देखील काढलं असेल. मात्र, त्याला जो परदेशात आनंद मिळाला नसता तो आता मिळतोय.