पुणे : महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ बँकिं ग तज्ज्ञ आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँके चे प्रशासक विद्याधर अनास्कर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अध्यक्षपदाचा कार्यकाळ पुढील तीन वर्षांसाठी आहे. या पदाला राज्यमंत्रीपदाचा दर्जा आहे. अनास्कर ३० वर्षांपासून राज्याच्या सहकार क्षेत्रात कार्यरत आहेत. ते सध्या राज्य बँके चे प्रशासक, नॅशनल फे डरेशन ऑफ अर्बन बँक्सचे उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र अर्बन बँक्स फे डरेशनच्या अध्यक्षपदी कार्यरत आहेत. पुण्यातील विद्या सहकारी बँके चे ते कार्यवाहक संचालक तसेच आरबीआयने नागरी सहकारी बँकांसाठी स्थापन के लेल्या महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात आणि जम्मू-काश्मीर राज्याचे सदस्य आहेतसहकारी चळवळीचा आढावा घेणे आणि राज्यातील सहकारी संस्थांच्या कार्याचा समन्वय साधण्याचे मार्ग सुचवणे, सहकारी संस्थांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी उपाय सुचवणे, सहकारी चळवळीच्या विकासाबाबतच्या योजना व धोरणांची शिफारस करणे अशी कामे महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेकडून करण्यात येणार आहेत.