पुण्यात एका २५ वर्षीय महिलेवर घरात घुसून चौघांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेतील चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे.या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
दत्तवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास एका महिलेने फोन केला की, एका महिलेचा घरातून रडण्याचा आवाज येत आहे. तिला मदतीचा गरज असल्याचा फोन आला. तेव्हा आम्ही तात्काळ घटनास्थळी धाव घेतला असता. तिथे सात-आठ महिला घराजवळ थांबलेल्या होत्या. त्या घराजवळ गेल्यावर आम्ही आतमधील महिलेला आवाज दिला. तेव्हा देखील रडण्याचा आवाज येत होता .पण काही केल्या दरवाजा उघडला गेला नाही. त्यावर अखेर आम्ही दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. तेव्हा पीडित महिलेसह चार आरोपी आढळून आले. त्यानंतर तात्काळ पीडित महिलेला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. चारही जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.