पुणे - शहरातील दोन वेगवेगळ्या अपघातामध्ये दोघेजण ठार झाले आहेत. दोन्ही अपघात ५ सप्टेंबरला घडले आहेत. भरधाव टेम्पो चालकाने दिलेल्या धडकेत पादचारी पोपट चखाले (वय ४५) यांचा मृत्यू झाला. ही घटना खराडातील रॅडीसन चौकात घडली. याप्रकरणी ऋषीकेश पोपट चखाले (वय २२) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
भरधाव मोटार चालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरूण ठार झाला. हा अपघात दोन दिवसांपुर्वी रात्री बाराच्या सुमारास कदमवाक वस्तीनजीक कवडीपाट टोल नाक्याजवळ घडला. प्रसाद राजेंद्र भोसले (वय २२ रा. कवडीपाट) असे ठार झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी रवीराज ज्ञानेश्वर मोरे रा. महादेवनगर, हडपसर याच्याविरूद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.