पुणे - मोबाइल सीमकार्डची माहिती अद्यायावत करण्याची बतावणी करून चोरट्यांनी एकाच्या बँक खात्यातून ऑनलाइन पद्धतीने पन्नास हजार रुपये लांबविल्याची घटना उघडकीस आली. याबाबत कर्वेनगर भागातील एका नागरिकाने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तक्रारादाराच्या मोबाइल क्रमांकावर चोरट्यांनी संपर्क साधला होता. मोबाइल कंपनीतून बोलत असल्याची बतावणी चोरट्यांनी केली होती. मोबाइल सीमकार्डची माहिती अद्यायावत करण्याचे काम सुरू असून माहिती न दिल्यास सीमकार्ड बंद पडेल, अशी बतावणी चोरट्यांनी केली.
चोरट्यांनी बँक खात्याची गोपनीय माहिती घेतली. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना टीमव्ह््युअर क्विक सपोर्ट अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. चोरट्यांनी तक्रारदाराच्या बँक खात्यातून ४९ हजार ९५० रुपये लांबविले. गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक अमृत मराठे तपास करत आहेत.
डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा