पुणे : ज्येष्ठ सुलेखनकार आणि छायाचित्रकार कुमार गोखले (६३) यांचे दीर्घ आजाराने सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात बंधू, वहिनी, विवाहित पुतण्या असा परिवार आहे.
मूळचे मिरजचे असलेले गोखले रसायनशास्त्राचे पदवीधर होते. त्यांनी चित्रकलेचे आणि छायाचित्रणाचे शिक्षण घेतलेले नव्हते. मात्र उपजत गुण, निरीक्षण आणि स्वत: के लेल्या अभ्यासाच्या जोरावर त्यांनी सुलेखन, जाहिरात आणि छायाचित्रण क्षेत्रात आपला अमीट ठसा उमटवला. ‘पुन्हा यादों की बारात’ अशी काही पुस्तके , ‘समाजस्वास्थ्य’, ‘झुंड’ अशी नाटके , ‘लालबाग परळ’, ‘व्हेंटिलेटर’, ‘लोकमान्य एक युगपुरुष’, ‘बके ट लिस्ट’ अशा चित्रपटांच्या जाहिरातीतील सुलेखन, छायाचित्रण गोखले यांनी के ले.
आजच्यासारखे तंत्रज्ञान उपलब्ध नसतानाच्या काळातही त्यांनी सुलेखनामध्ये अनेक प्रयोग के ले. बहुतेक सर्व नामवंत नाटय़संस्थांसाठी त्यांनी काम केले. मराठी नाटक आणि चित्रपटासाठी त्यांनी लक्षणीय आणि बहुमूल्य योगदान दिले. त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते.