पुणे, 04 जानेवारी : पुणे (Pune) ग्रामीण पोलीस दलात काम करणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्यानं 29 वर्षीय महिला वकिलावर बलात्कार (woman lawyer raped by police) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपी पोलिसानं पीडित महिलेला लग्नाचं आमिष (Lure of marriage) दाखवून विविध ठिकाणी घेऊन जात तिच्यावर बलात्कार केला आहे. गेल्या जवळपास पावणे दोन वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. या प्रकरणी पीडित महिला वकिलाने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी बलात्कारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
लक्ष्मण गंगाधर राऊत असं गुन्हा दाखल झालेल्या 33 वर्षीय आरोपी पोलिसाचं नाव आहे. आरोपी राऊत हा सध्या पाषाण परिसरातील पत्रा चाळ येथे वास्तव्याला असून तो मूळचा लोणी काळभोर येथील रहिवासी आहे. तो सध्या पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या एटीएस सेलमध्ये कार्यरत आहे. याप्रकरणी 29 वर्षीय महिला वकिलानं चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राऊत याची एका मेट्रोमोनिअल साइटवरून फिर्यादीशी ओळख झाली होती. या संकेतस्थळावर संवाद साधल्यानंतर आरोपी राऊत याने पीडित महिलेचा मोबाइल नंबर घेतला होता. यातूनच त्याने संवाद साधत पीडितेशी ओळख वाढवली. यानंतर लग्नाचं आमिष दाखवून आरोपीनं पीडित महिलेवर वेळोवेळी लैंगिक शोषण केलं आहे.
आरोपीनं पीडित महिला वकिलाला देहूरोड, पिंपळे निलख परिसरातील विविध लॉजवर घेऊन जात तिच्यावर अनेकदा बलात्कार केला आहे. गेल्या पावणे दोन वर्षांपासून लैंगिक संबंध ठेवल्यानंतर आरोपीनं पीडित महिला वकिलाशी लग्न करण्यास नकार देत, तिची फसवणूक केली आहे. या प्रकारानंतर पीडित वकिलानं चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात जात, पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण राऊत विरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.