पुणे- जिल्ह्यातील आंबेगाव , जुन्नर , शिरूर , मावळ या तालुक्यामध्ये वाढ असलेला बिबट्याचा अधिवास नागरीकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. बिबट्याच्या वाढत असलेल्या संख्येमुळे बिबट्याने नागरिकांवर हल्ला करण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. मागील कलाही दिवसांपूर्वीबिबट्याने कुत्र्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र कुत्र्याने बिबट्यावर पलटवार करत बिबट्याला पळवून लावल्याची घटना घडली होती. यानंतर आता आंबेगाव तालुक्यातील लाखणगाव परिसरात बिबट्यानं कुत्र्यावर हल्ला करत ,त्याची शिकार केल्याचे समोर आले आहे. या घटनेचा सर्व थरार सीसीटीव्हीची कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
घडलं असं की
आंबेगाव तालुक्यातील लाखणगाव परिसरात बिबट्याचा वावर आहे. घटनेच्या वेळी शेतक सतीश रोडे राहत असलेल्या परिसरात बिबट्या आला. सतीश रोडे यांनी पाळलेल्या कुत्र्याने भुंकण्यास सुरवात केली मात्र कुत्र्यांच्या भुंकण्याला न जुमानता बिबट्याने कुत्र्याची शिकार करत. कुत्र्याचा फडशा पाडला आहे. हल्ल्याचा हा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाला, असून बिबट्याच्या वाढत्या दहशतीने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे .
जेरबंद करण्याची मागणीपरिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतात काम करताना बिबट्या हलला करू शकतो, अशी भीतीही नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे. यापूर्वी मावळ भागातील शेतकरी दाम्पत्यावर बिबट्याने हलला केला होते. त्यानंतर जुन्नरमधील एका व्यक्तीवर हल्ला करत बिबट्याने जखमी केलं होते. वन विभागानं तातडीने या परिसरात पिंजरा लावत बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.