मुंबई – मुंबई महानगर महाविकास प्राधिकरणाकडून (MMRDA) पुणे (pune) आणि मुंबईतील (mumbai) लोकांचा प्रवास करण्यासाठी चांगली योजना आखल्याचे पाहायला मिळत आहे. कारण एमएमआरडीएकडून प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ व्हावा यासाठी एक मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग ट्रान्स हार्बर लिंक रस्ता जोडण्याची योजना तयार करण्यात आली आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग तयार झाल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांचा प्रवास जलद होणार आहे. हा अत्यंच विस्तृत प्रकल्प असून त्यासाठी मुंबई महानगर महाविकास प्राधिकरणाकडून अहवाल तयार करण्यासाठी सल्लागारांची नेमणूक करणार असल्याचं समजतंय. त्यासाठी मुंबई महानगर महाविकास प्राधिकरणाने इच्छूक कंपन्यांकडे निविदा देखील मागितल्या आहेत. महामार्ग जोडल्याने पुणे-मुंबई प्रवास अत्यंत जलदगतीने होईल.
हा देशातील सर्वात प्रकल्प
21.8 किलोमीटर समुद्र लांबीचा हा प्रकल्प असून त्यासाठी निविदा मागिविण्यात आल्या आहेत. मुंबई महानगर महाविकास प्राधिकरणानं हा प्रकल्प लवकर मार्गी लावण्याच्या तयारीत आहे. देशातील हा सर्वात मोठा समुद्र किनारी मार्ग असून एमटीएचएल हा प्रोजेक्ट मुंबई महानगर महाविकास प्राधिकरणाकडून उभारण्यात येत आहे. हा मार्ग जोडल्यामुळे मुंबईतलं ट्रफिक कमी होण्यास मदत होईल. तसेच मुंबईतल्या अनेक ठिकाणी पोहोचण सोप्पं जाईल. आत्तापर्यंत मुंबईतली वाहतुकीची कोंटी सुटावी म्हणून मुंबई महानगर महाविकास प्राधिकरणाकडून चांगले प्रयत्न केले होते. सध्याचा प्रकल्प मार्गी लागल्यानंतर त्यांना काही प्रमाणात यश येईल.
इथे जोडला जाणार महामार्ग
मुंबईतील ट्रॅफिकची समस्या अधिक असल्याने शहराबाहेरच्या लोकांचा प्रवास सुरक्षित व्हावा असं मुंबई महानगर महाविकास प्राधिकरणाला वाटतं असल्याने त्यांनी ट्रान्स हार्बर लिंक रस्ता महामार्गाला जोडणार असल्याचे जाहीर केले आहे. हा रस्ता शिवडी, शिवाजी नगर नवीमुंबईत जोडला जाणार आहे. तसेच हा महामार्ग तयार झाल्यास या महामार्गावरून 70 हजार रोज वाहने जातील असा मुंबई महानगर महाविकास प्राधिकरणाने व्यक्त केला आहे. हा प्रकल्प झाल्यानंतर प्रवासी तातडीने मुंबईत कामासाठी पोहोचेन तसेच महामार्गावरून रोज हजारो वाहने गेल्याने मुंबईतलं ट्रॅफिक काही प्रमाणात कमी होईल.