पिंपरी – शहरात अंधश्रद्धेचा ( superstition) अघोरी प्रकार उघडकीस आला आहे. तुमच्या घरावर काळी जादू झाली आहे. ती काळी जादू काढून टाकण्यासाठी पूजा करण्याची असल्याचे सांगत पूजा करावी लागणार आहे. त्यासाठी महिलेकडून 20 लाख रुपये घेतले. त्यानंतर संबंधित महिलेला गुंगीचे औषध देत बलात्कार(Rape case) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. किवळे, मारुंजी व औरंगाबाद जिल्ह्यात ऑक्टोबर 2020 ते 19 जानेवारी 2021 या कालावधीत हा प्रकार घडला. या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी (Pimpri Chinchwad Police) भोंदू बाबाला अटक केली आहे. विनोद शंकर पवार (वय 33 , काळेवाडी) असे भोंदूबाबाचे नाव आहे. याबाबत पिडीत 38 वर्षीय महिलेने देहूरोड पोलिसात तक्रार दिली आहे.
पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिलेच्या कुटुंबात कौटुंबिक वाद सुरु होते. यावर तोडगा काढण्यासाठी संबंधित महिलेने भोंदूबाबाकडं विचारणा केली. यावर त्या भोंदूबाबाने मला तुमच्या घरी येऊन बघावे लगेल असे सांगितले त्यानंतर आरोपी विनोद पवार पीडित महिलेच्या घरी गेला. तिथे त्याने तुमच्या घरावर काळी जादूनं केली आहे. त्यामुळे घरात कौटुंबिक कलह होत असल्याची माहिती दिली. ही काळी जादू डोईवर करण्यासाठी तुम्हाला पूजा करावी लागेल. त्यासाठी 30 हजार रुपये खर्च येईल सांगितले. त्याप्रमाणे पीडित महिलेने पूजाही केली असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.
त्यानंतर आरोपीने पीडित महिलेला काळ्या जादूची भीती दाखवता २० लाखरुपये खंडणी घेतली. त्यानंतर संबंधित महिलेला धमकी देत ठिकठिकाणी घेऊन जात तिच्यावर बलात्कार केल्याची माहितीही पीडित महिलेने पोलिसांना दिली आहे. खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक अजय जोगदंड, उपनिरीक्षक संगीता गोडे, सहायक फौजदार अशोक दुधवणे, पोलीस कर्मचारी किरण काटकर, प्रदीप गोडांबे, आशिष बोटके, अमर राऊत, प्रदीप गायकवाड, प्रदीप गुट्टे, अनिता जाधव यांच्या पथकाने हे करवाई केली आहे.