श्रीवर्धन मध्ये दिव्यांग दिन साजरा

श्रीवर्धन (समीर रिसबूड)- दिनांक ०३-१२-२०२० रोजी सकाळी ११:०० वाजता जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून श्रीवर्धन येथे श्रीवर्धन तालुका विधी सेवा समिती व दिव्यांग संघटना श्रीवर्धन या संघटनां मार्फत बाबासाहेब आंबेडकर स्मारक, श्रीवर्धन या ठिकाणी जागतिक अपंग दिन साजरा केला गेला.

   à¤•à¤¾à¤°à¥à¤¯à¤•à¥à¤°à¤®à¤¾à¤šà¥‡ अतिथी ॲड.अतुल चोगले यांनी आपल्या भाषणात अपंग मुलांच्या कल्याण कारी योजना या बद्दल माहिती दिली.एकाच शाळेत आठ पेक्षा जास्त अपंग विद्यार्थ्यांचा गट असल्यास अपंग विद्यार्थ्यांना शासनाकडून रिसोर्स टिचर,लेखन सामुग्री करित आर्थिक मदत दिली जाते.त्याच प्रमाणे आरक्षण व राखीव जागा या बाबतीत माहिती देऊन रोजगार, स्वयंरोजगार त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाकडून सरळ सेवेतील भरती करीता ३% आरक्षण आहे हे नमुद केले.

  सहाय्य गटविकास अधिकारी श्री.बाळासाहेब भोगे यांनी पंचायत समिती कडून दिव्यांगाना मिळणारे फायदे या बाबतीत माहिती दिली. कार्यशाळांमधुन अपंगांना व्यवसाय प्रशिक्षण, अपंगांसाठी स्वयंरोजगारा साठी बीज भांडवल,योजनेचे स्वरूप ह्या बाबतीत माहिती दिली. 

   à¤…ध्यक्षीय भाषणात श्री.प्रतिक लंबे यांनी अपंगांना समाजात मानाचे स्थान मिळावे,अपंगत्व हे शारीरिक कमतरता न ठरता ते बलस्थान ठरावे.दिव्यांग हाच शब्द समाजात प्रचलित व्हावा,तसेच अपंग व्यक्तींना आधुनिक, टिकाऊ उपकरणे व साहित्य उपलब्ध करून देऊ.असे आपल्या भाषणात सांगितले. 

  या कार्यक्रमासाठी श्री.प्रतिक लंबे, गटविकास अधिकारी मैनाक घोष,सहाय्यक गटविकास अधिकारी बाळासाहेब भोगे  à¤‰à¤ªà¤µà¤¿à¤­à¤¾à¤— पोलीस अधिकारी बापुराव पवार,रवीदास जाधव,ॲड.अतुल चोगले, राजेश चव्हाण हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. किरण चाळके यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन सरचिटणीस दिपक शिर्के,निलेश नाक्ती,मुईद सरखोत,उदय माळी व भरत पवार यांनी केले होते.

Comments : 0


    No Comments

Leave a comment