*पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते श्री कालभैरव देवस्थान मुगवली कलशारोहन समारंभ संपन्न*



अलिबाग :-  श्री काळभैरव देवस्थान मुगवली मूर्ती प्राणप्रतिष्ठापना, कलशारोहण व उद्घाटन समारंभ पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत आज माणगाव येथे पार पडला. तसेच या मंदिराचे उद्घाटनही खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. 
   à¤¯à¤¾à¤µà¥‡à¤³à¥€ सुभाष केकाणे, अलका जाधव, उपसभापती महेंद्र तेटगुरे, माजी सभापती राजेश पानावरकर, पं. स. सदस्या अलका केकाणे, ग्रा. पं. लोणशी सरपंच दिपाली चेरफळे यासह शेकडो भाविक, नागरिक उपस्थित होते. 
    या कार्यक्रमाचे आयोजन ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ, मुबंईकर मंडळ मुगवली यांनी केले होते. हा कार्यक्रम भक्तीमय वातावरणात, उत्साहात, शासनाने  नेमून दिलेल्या नियमांचे पालन करीत संपन्न झाला.

Comments : 0


    No Comments

Leave a comment