हयातीचा दाखला सादर करण्यास 28 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ

अलिबाग  :  राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक, अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषीतर विद्यापीठे आणि जिल्हा परिषदांचे निवृत्तीवेतनधारक यांना हयातीचा दाखला सादर करण्यास दि.28 फेब्रुवारी 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे शासनाकडून परिपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.

            राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांना दरवर्षी दि. 01 नोव्हेंबर पासून ते दि. 30 नोव्हेंबर पर्यंत निवृत्तीवेतन आहरण व संवितरण प्राधिकाऱ्यास सादर करावा लागतो. हा हयातीचा दाखला मुख्यत: संबंधित निवृत्तीवेतनधारक ज्या बँकेतून निवृत्तीवेतन घेतात त्या बँकेमार्फत संबंधित कोषागारात सादर केला जातो.

             à¤¯à¤¾ वर्षात कोविड-19 मुळे हयातीचा दाखला सादर करण्यासाठी प्रथम दि.31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.  कोविड-19 चा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता केंद्र शासनाच्या धर्तीवर वित्त विभागाच्या शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-2020/प्र.क्र.90/कोषा प्रशा-5 दि. 8 डिसेंबर 2020 नुसार आता ही  मुदत दि.28 फेब्रुवारी 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

              तरी सर्व निवृत्तीवेतनधारकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी डॉ.फिरोज मुल्ला यांच्याकडून करण्यात आले आहे.

Comments : 0


    No Comments

Leave a comment