वायुगळतीमुळे महाड MIDC मध्ये, सात कर्मचाऱ्यांना बाधा
अलिबाग : रायगडमधील महाड MIDCमध्ये इंन्डो अमाईन्स कंपनीत वायुगळीची ही घटना घडली. यात दुर्घटनेत सात कर्मचारी बाधीत झाले असून त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
महाड औद्योगिक वसाहतीमधील इंडो अमाईन कारखान्यात वायुगळती झाल्याने खबरदारी घेण्यात येत असून परिसरात अर्लट जारी करण्यात आला आहे. महाड येथील खासगी रुग्णालयात वायुगळतीत बाधित कामगारांवर उपचार सुरू आहेत.
गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास तेथे काम सुरू असताना हायड्रोजन सल्फाईडची गळती झाली. हे लक्षात येताच फायर अँड सेफ्टीची टीम बोलावण्यात आली . गळती थांबवण्यात यश आले असून तरी कंपनीच्या परिसरात कुणाला प्रवेश दिला जात नाही. त्याठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.