प्रतिनिधी : प्रसाद मोरे
रोहा : धाटाव MIDC च्या कंपन्यांवर शासनाचे कोणतेही अंकुश राहिलेले दिसत नाही. MIDC च्या शेजारी असणाऱ्या गावांना याचा नेहमी फटका बसत आहे. रोठ बुद्रुक या गावा जवळ काही कंपन्या आहेत त्या कंपन्यामधून मागील तीन महिन्यांपासून रासायनिक पाणी सोडण्यात येत आहेत. हे रासायनिक पाणी शेजारी वाहणाऱ्या गंगा व कुंडलिका नदीत जाऊन या नद्या दुषित होत आहेत त्याच बरोबर या कंपन्यामधून येणारी पाईप लाईन जाम झाली असून त्या रासायनिक पाण्याचा निचरा होताना दिसत नाही. या मुळे सर्वीकडे दुर्गंध पसरलेला आहे. आणि याचा नाहक त्रास शेजारी असणाऱ्या गावांना भोगावा लागत आहे. या सर्व गोष्टीकडे तेथील कंपन्या दुर्लक्षित करताना दिसत आहे. त्यामुळे कुठेतरी शासनाचा त्यांना अभय आहे त्यामुळे या कंपन्यांचा मनमानी कारभार सुरु आहे.