श्रीवर्धन (समीर रिसबूड)- श्रीवर्धन तालुका शिक्षण प्रसारक व सहाय्यक मंडळ या संस्थेच्या रविंद्र नारायण राऊत माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,श्रीवर्धन येथील स्थानिक शाळा समिती कडून शैक्षणिक कार्य तसेच सामाजिक कार्याबद्दल एक शिक्षक व एक शिक्षिका अशा दोन शिक्षकांचा गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात येतं.
स्थानिक शाळा समिती सभापती जितेंद्र सातनाक यांच्या संकल्पनेतून तसेच अध्यक्ष अनिल भुसाणे व कार्यवाह योगेश गंन्द्रे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली ०५ सप्टेंबर ह्या शिक्षक दिनाच्या दिवशी तसेच भारताचे माजी राष्ट्रपती डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवसाचे औचित्य साधत शैक्षणिक कार्य व सामाजिक कार्याबद्दल दोन शिक्षकांना गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात येतं.साधारण दोन वर्षांपूर्वी पासून शिक्षकांना गौरवपत्र, शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्याची प्रथा स्थानिक शाळा समिती कडून सुरू करण्यात आली होती. परंतु, गेल्या वर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व निर्बंध ह्या कारणांमुळे हा कार्यक्रम स्थगित करावा लागला होता.
शिक्षणक्षेत्रात योगदान देणार्या शिक्षकांच्या आदरार्थ शिक्षक सन्मान गौरव हा कार्यक्रम शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करत साजरा करायचा हा निर्णय स्थानिक शाळा समितीनी घेतल्यामुळे रविवार, दिनांक ०५ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी अकरा वाजता र.ना.राऊत हायस्कूलच्या सभागृहात संपन्न झाला.मुख्याध्यापक रविंद्र सिताराम ढाकणे ह्यांना रायगड जिल्हा शालेय शिक्षण विभाग अलिबाग-रायगड द्वारे सन २०२१-२०२२ या वर्षातील"आदर्श शिक्षक पुरस्कार"अध्यक्ष अनिल भुसाणे ह्यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.स्थानिक शाळा समिती कडून शैक्षणिक कार्य व सामाजिक कार्याबद्दल दोन शिक्षकांचा सन्मान गौरव पुरस्कार देण्यात येतो तो पुरस्कार सहाय्यक शिक्षक संदिप महादेव भगत व सहाय्यक शिक्षिका श्रीम.प्रणिता मिलिंद माने ह्या शिक्षकांना देण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात अनिल भुसाणे यांनी सांगितले,"भारताचे दुसरे राष्ट्रपती डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे शिक्षकच होते.शिक्षकि पेशा हा असा आहे की शिक्षक आपला ठसा कुठल्याही क्षेत्रात उमटवू शकतात.मोठमोठे शास्त्रज्ञ अगोदर पेशानी शिक्षकच होते.त्याचप्रमाणे देशातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले होत्या याचा उल्लेख आवर्जून केला पाहिजे.जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी शाळा सुरु केली.परंतु, शाळेत शिकवण्यासाठी शिक्षिका मिळतं नव्हती.काही काळानंतर त्यांना शिक्षिका मिळाली.ती होती मुस्लिम समाजातील तीच नाव होत फातिमा.तसेच आपल्या शाळेत शिक्षकांनी केलेल्या कामाची पोचपावती म्हणून आपल्या स्थानिक समिती कडून शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल शिक्षक सन्मान गौरव करण्यात येतो.माझ्या हातून मुख्याध्यापक ढाकणे सर यांना पुरस्कार दिला जातोय हे माझं भाग्य समजतो."
शिक्षक सन्मान गौरव कार्यक्रमास अध्यक्ष अनिल भुसाणे, कार्यवाह योगेश गंन्द्रे,नरेश पुलेकर गुरूजी,दत्तात्रेय कोसबे,सदानंद केळस्कर,विष्णू पवार,ॠतुजा भोसले त्याचप्रमाणे शिक्षक,शिक्षकेतरवर्ग उपस्थित होते.