रत्नागिरी तालुक्यातील वरवडे तिवरे बंदर येथे बेकायदेशीरपणे जुगार चालवल्या प्रकरणी एकाच्या विरोधात जयगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या कारवाईत रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण 2090 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी दिनांक 04 सप्टेंबर रोजी झाली. शुभानंद चंद्रकांत मांडवकर (41 मालगुंड रहाटघरवाडी रत्नागिरी) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे . याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळू पालकर यांनी तक्रार दिली आहे. अधिक पोलिस तपास सुरू आहे .