श्रीवर्धन (समीर रिसबूड)- देशातील पोषण स्थितीवर पोषण अभियान ह्या कार्यक्रमाची अंमलबजावणी होत असुन या अभियानांतर्गत ०१ सप्टेंबर २०२१ ते ३० सप्टेंबर २०२१ या कालावधीत पोषण माह हा कार्यक्रम साजरा करण्यात येतो.
पोषण आहाराचे महत्व समजावून घेण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतींमधून पोषण पंचायत उपक्रम राबविण्यात येणार असून शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा, सुविचार,प्रभातफेरी असे उपक्रम राबविण्यात येतील.आरोग्य विभागामार्फत महिला व बालके यांची आरोग्य तपासणीचे आयोजन करण्यात येईल.
श्रीवर्धन पंचायत समिती कार्यालयात पोषण अभियान कार्यक्रमाच्या अनुषंगाने पोषण आहार प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.ह्या वेळेला पंचायत समिती सभापती बाबुराव चोरगे,सदस्य मंगेश कोमनाक,गटविकास अधिकारी उध्दव होळकर,सहा.बाळासाहेब भोगे,बालविकास प्रकल्प अधिकारी राजन सांबरे,वि.अ.भारत कुबेर व कर्मचारी वर्ग उपस्थित होता