श्रीवर्धन (समीर रिसबूड)- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन तसेच निर्बंध ह्या मुळे गणेशोत्सवाच्या काही दिवस अगोदर बाजारावर काही प्रमाणात मंदिचे सावट आले होते.परंतु,हरितालिका तृतीयेला बाप्पांचे आगमन होताच भक्तांमधे आलेली मरगळ दुर होऊन उत्साहात सार्वजनिक तसेच घरगुती गणपती विराजमान झाले.दहा तारखेला प्रतिष्ठापना झाल्यानंतर आज अकरा तारखेला दिड दिवसांच्या गणपतींचे राज्यशासनाने दिलेल्या नियमावली नुसार विसर्जन करण्यात आले.
श्रीवर्धन शहरातील एक वैशिष्ट्य म्हणजे गणपती पाखाडीमधला असो आळीतला.विसर्जनासाठी बाप्पांना एकत्र जमून समुद्रात विसर्जन केलं जातं. नाल,टाळ,मृदुंग ह्या वाद्यांच्या तालावर भजने म्हणत तसेच प्रत्येक नाक्यावर आरत्या ह्या पुर्वपरंपरागत प्रथेनुसार गणेश मुर्ती समुद्रकिनारी आणून मुर्तींची कापूर आरती तसेच बाप्पांचे विसर्जन करते वेळी मुर्ती बरोबर दही पोहे ठेवून समुद्रात विसर्जन करते वेळी,"गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या. गणपती गेले गावाला चैन पडे ना आम्हाला." ह्या घोषणांनी गणेश मुर्तींचे विसर्जन केले जाते.