श्रीवर्धन(समीर रिसबूड)- श्रीवर्धन तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा बुरुज हळूहळू ढासळायला सुरुवात झाली असुन काही वर्षापूर्वी गैरसमजातून शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर काही महिन्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस मधे प्रवेश केलेले माजी जि.प.सदस्य अविनाश कोळंबेकर यांनी तसेच राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी श्रीवर्धन तालुक्यातील हुकुमशाही व दादागिरी प्रवृत्तीच्या पदाधिकार्यांना कंटाळून सोमवार, दिनांक २० सप्टेंबर रोजी रानवली येथील मा.केंद्रियमंत्री अनंत गिते ह्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहिर प्रवेश केला.
रानवली येथील जि.प.मराठी शाळेच्या पटांगणात प्रवेशसोहळ्याच्या दरम्यान उपशहरप्रमुख जुनैदभाई दुस्ते व युवासेना उपशहरप्रमुख शादाब पटेल ह्यांच्या प्रयत्नांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे वालवट,जसवली येथील मुस्लिम भगिनींनी व बांधवांनी मा.अनंत गिते ह्यांच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधले.
प्रवेशकर्त्यांची नावे-अब्दुल्ला मिरकर,दिलदार दर्वेश,इम्रान दर्वेश,रियाझ वालवटकर,अबरार चाऊस,इस्माईल वालवटकर,मुश्ताक जिवराक,फारूक वालवटकर, असीफ तांबारे,इस्माईल बोरकर,नझीम जिवराक, लियाकत दर्वेश,महमूद खेमा,यासर मिरकर,मरूफ जिरवाक,अब्दुल ओंबीलकर,अझाद जिरवाक, अदनान दर्वेश,मोहसीन जिरवाक, तज्जमुल जिरवाक,अब्दुल खेमा,अब्दुल दाते,लियाकत सोंडे ह्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सेनेत प्रवेश केला.
प्रवेशकर्त्यांचा सन्मान करत शोएब हमदुले(अल्पसंख्यांक तालुकाप्रमुख), मौलाना काझी(अल्पसंख्यांक श्रीवर्धन शहरप्रमुख), हीना शादाब पटेल(महिला अल्पसंख्यांक शहरप्रमुख) ह्यांची पदांवर नियुक्ती करण्यात आली.
ह्या वेळेला उपशहरप्रमुख जुनैद दुस्ते यांनी सांगितले,"मुस्लिम समाज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे ह्यांचा सन्मान करणारा आहे.मला पुर्णपणे खात्री आहे येणार्या नगरपरिषद निवडणूकांमधे मुस्लिम समाजाचे शिवसेनेला शंभर टक्के योगदान असेल.एवढेच नाही तर शिवसेनेचे नगरसेवकही निवडून येणार हा मी शब्द देतो."