श्रीवर्धन (समीर रिसबूड)- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,मुंबई यांच्या सुचनेनुसार दि.२५ सप्टेंबर २०२१ रोजी श्रीवर्धन येथे राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक २५ सप्टेंबर रोजी होत असलेल्या राष्ट्रीय लोक अदालती मधे न्यायालयात प्रलंबित असलेली भूसंपादन प्रकरणे,मोटार अपघात प्रकरण,दिवाणी प्रकरणे अथवा आपिले,तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे,१३८ एन.आय.ॲक्ट त्याचप्रमाणे नगरपरिषद, ग्रामपंचायत यांच्या घरपट्टी,पाणीपट्टी बिलाच्या देयकाबाबतची प्रकरणे,भारत दुर संचार निगम मर्यादित,महावितरण वीजबीले, राष्ट्रीयकृत बॅका तसेच पतसंस्था ह्या बाबतची थकबाकी प्रकरणे लोक अदालतीत तडजोडी साठी ठेवण्यात आली आहेत.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्रीम.विभा प्र.इंगळे,अलिबाग यांनी आवाहन केले आहे, "दिनांक २५ सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या लोक अदालतीचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा.प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे.राष्ट्रीय लोक अदालतीमधे प्रलंबित प्रकरणे तडजोडीने निकालात काढल्यास संपुर्ण कोर्ट फी परत मिळते तसेच प्रलंबित व वादविवाद पुर्ण प्रकरणातील निकालाविरूध्द अपिल होत नाही.याचा फायदा पक्षकारांना होतो. पक्षकाराचा खर्च,वेळ दोन्ही वाचतो व पक्षकारांना जलद व तात्काळ न्याय मिळतो."