प्रतिनिधी :प्रसाद मोरे (रोहा)
प्रशासन म्हणतंय व्यवस्थित सुरक्षा कर...
26/11च्या मुंबई मध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यामुळे शासनाने सर्वीकडे सुरक्षा वाढवली आहे. समुद्र किनारपट्टी सुरक्षित राहावी याकरीता सात जिल्ह्यातील सागरी किनारपट्टीवर ९१ केंद्र तळ उभारलेली आहेत व त्या केंद्र तळावर ३०५ सुरक्षा रक्षक व काही पर्यवेक्षक नेमण्यात आले आहेत. आणि तसेच रायगड जिल्ह्यातील सागरी किनारपट्टीवर २४ केंद्र तळ उभारलेली असून त्या केंद्र तळावर ७५ सुरक्षारक्षक व ५ पर्यवेक्षक नेमण्यात आले आहेत. हे सुरक्षा रक्षक जीवाची पर्वा न करता तसेच ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता, कोरोना काळातही आपली ड्युटी प्रामाणिक पणे करीत आहेत. पण आता त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. कारण शासनाने गेल्या चार महिन्यापासून त्यांचे वेतनच दिलेले नाही.या सर्व परिस्थितीची माहिती मिळताच रोहा तालुक्याचे राष्ट्रवादी चे उपाध्यक्ष राजुशेठ पोकळे यांनी सुरक्षा रक्षक बिपीन यांच्या सोबत राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री मा. आदीतीताई तटकरे यांची भेट घेतली सुरक्षा रक्षकांच्या समस्या मांडल्या आणि त्यांचे थकित वेतन लवकरच देण्यात यावे यासाठी निवेदन ही दिले.
सुरक्षा रक्षकांचे थकीत वेतन जर लवकर दिले नाही तर आंदोलन करण्याचा इशारा ही सुरक्षा रक्षकांनी दिला आहे.