उपरोक्त विषयानुसार रायगड जिल्ह्यातील विशेषतः पनवेल शहरातील अनेक रुग्णालये ही रुग्णालयाच्या फलकावर धर्मादाय अथवा चॅरिटेबल असा शब्द लिहीत नसल्यामुळे खऱ्या अर्थाने गरीब व वंचित रुग्णांना या योजनेचा लाभ रुग्णालयात मिळत नाही असा आरोप सुनील शिरीषकर, राज्य महासचिव, सत्यमेय जयते संघटनेचे पदाधिकारी यांनी केला आहे. जिल्हातील धर्मादाय रुग्णालयातील गरीब रुग्णांसाठीच्या राखीव खाटांचा पुरेसा वापर होत नसल्याचे याआधी ही उघडीस आले असून यापुढे जी रुग्णालये " धर्मादाय " नोंदणीकृत आहेत अशा रुग्णालयांनी आपल्या नावाच्या पाटीवर " धर्मादाय रुग्णालय" असे स्पष्ट लिहले पाहिजे व या धर्मादाय कायद्याची कडक अंमलबजावणी होण्याकरिता सुनील शिरीषकर यांनी सहाय्यक धर्मादाय आयुक्त, रायगड यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार दाखल केली आहे.
अनेक रुग्णालये ही धर्मादाय रुग्णालये असूनही तेथे गरीब रुग्णांना उपचार मिळत नाही म्हणून सर्व धर्मादाय रुग्णालयांनी रुग्णालयाच्या नावातील फळकामध्ये " धर्मादाय रुग्णालय " असे सुस्पष्टपणे लिहावे असे आदेश सर्व रुग्णालयांना यापूर्वी देण्यात आले होते, परंतु जिल्ह्यातील व पनवेल मधील जी रुग्णालयाने या आदेशाचे पालन करत नाही, अशा रुग्णालयांवर धर्मादाय कायदा कलम ६६ ' ब ' आणि ४१ ' ड ' अंतर्गत कसूर करणाऱ्या संबंधित रुग्णालयावर कारवाई करण्यात यावी ही मागणी सत्यमेय जयते संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे, तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर दप्तर दिरंगाई कायदा २००५ प्रमाणे कारवाई करण्यात ही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
आपला, सुनील शिरीषकर, राज्य महासचिव, सत्यमेय जयते संघटना.