श्रीवर्धन (समीर रिसबूड) - "दिवाळीची सुट्टी लागल्यापासून श्रीवर्धन तालुक्यात पर्यटकांची संख्या वाढायला लागली आहे.भविष्यात तिर्थक्षेत्र पर्यटन,निसर्ग पर्यटन कस वाढेल ह्या बाबींचाच एक भाग म्हणून दिवेआगरच्या सुवर्णगणेशाची प्राणप्रतिष्ठा अंगारखी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच मंगळवार, दिनांक २३ नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार ह्यांच्या हस्ते होणार आहे.तसेच श्रीवर्धन येथील ग्रामदेवता सोमजादेवी मंदिर,हरिहरेश्वर,बोर्ली येथील चिंचबादेवी,वाकळघर येथील गंगादेवी ह्या तिर्थक्षेतांचा योग्य पध्दतीने विकास करून भाविक जास्त प्रमाणात यावेत.ह्याचा प्रयत्न नक्कीच होईल.मी स्वतः खासदार म्हणून पालकमंत्री अदिती तटकरे,अनिकेतदादा तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कसोशीने प्रयत्न करतोय.जेणेकरून श्रीवर्धन तालुक्यात भविष्यात पर्यटन व भाविकांची संख्या नक्कीच वाढेल."अशी प्रतिक्रिया खासदार सुनीलजी तटकरे श्रीवर्धन तालुक्यात लोकार्पण व उद्घाटन सोहळ्यासाठी आले असता दिली.
खासदार सुनीलजी तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली विविध खात्याच्या अधिकारी वर्गासोबत शासकीय विश्रामगृहात येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.आढावा बैठक संपन्न झाल्यानंतर श्रीवर्धन येथील जीवनाबंदर विद्युत जनित्राचे उद्घाटन,शेखाडी येथील श्री समर्थ कृपा सभागृह उद्घाटन,राष्ट्रीय पेयजल योजना, रस्त्याचे काॅक्रिटीकरण त्याचप्रमाणे वाकळघर येथील गंगादेवी मंदिर सुशोभिकरण व सामाजिक भवनाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला,दरम्यान खासदार सुनील तटकरे ह्यांच्या कार्यशैलीवर व केलेल्या विकासकामांची दखल घेत वाकळघर येथील ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेस मधे प्रवेश केला.
प्रवेशकर्त्यांचे स्वागत करतांना,"विश्वास हा मिळवावा लागतो.काही जण डोक्यानी काम करतात पण हृदयानी नाही,हृदयानी काम करतात पण डोक वापरत नाहीत. पण मी डोक आणी हृदय दोन्हीचा वापर करून काम करतो."असा टोला विरोधकांना लगावला.
लोकार्पण सोहळा व उद्घाटन समारंभासाठी तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
श्रीवर्धन मतदारसंघ हा तटकरे कुटुंबियांना आंदण दिलेला नसुन होतं असलेल्या विकासकामांमुळे तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस बळकट होत चाललेला आहे.ह्याचे उदाहरण म्हणजे वाकळघर येथील ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेस मधे केलेला प्रवेश.राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांची पोचपावती आहे.होत असलेल्या विकासकामांमुळे ग्रामस्थ
"वाकळघर येथील गंगादेवी मंदिर सुशोभीकरणासाठी पंचेचाळीस लाख व सामाजिक भवनासाठी दहा लाख.असे पंचावन्न लाख होतात पण पंचावन्न लाख न म्हणता अर्धा कोटी असा उल्लेख करावा.कारण हल्ली लाखापेक्षा कोटीला जास्त महत्त्व असतं."अशी कोपरखळी खासदारांनी मारली.