पनवेल : उपरोक्त विषयानुसार राज्य शासनाने 12 ऑगस्ट 2021 रोजी सर्व खाजगी व विना अनुदानित शाळांना 15% फी कपात करण्याचा शासन निर्णय घेतला, परंतु त्याची अंमलबजावणी होत नसल्याने पुनश्च शासन निर्णयाची काटेकोरपणे अमलबजावणी करण्याकरिता शिक्षण संचालक, पुणे यांनी २० ऑक्टोबर २०२१ रोजी राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक / सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक /माध्यमिक ) जि.प. यांना तत्काळ महत्वाचे परीपत्रक काढून कारवाईचे आदेश दिले होते, परंतु त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.
म्हणनू पनवेल तालुक्यातील ज्या खाजगी व विनाअनुदानित शाळा या शासन निर्णयाची अंमलबजावणी करणार नाही, त्यांचावर महाराष्ट्र शैक्षणिक संस्था ( शुल्क विंनियमन ) अधिनियम २०११, या कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी सुनील शिरीषकर, राज्य महासचिव, सत्यमेव जयते संघटना यांनी गट शिक्षण अधिकारी, पनवेल व मा. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक ) रायगड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. करण्यात यावी.
आपला, सुनील शिरीषकर,राज्य महासचिव, महाराष्ट्र