पनवेल : सत्यमेव जयते संघटनेने पनवेल पालिका आयुक्त यांच्याकडे मागील महिन्यात सर्व खाजगी हॉस्पिटलांनी १५ सुविधांचे दरपत्रक दर्शनी भागात लावणे बाबत मागणी केली होती. ज्यामध्ये १) खाजगी हॉस्पिटलकडून आकारले जाणारे प्रवेश शुल्क, २) प्रति दिन आंतर रुग्ण दर (खात / अतिदक्षता कक्ष), ३) वैद्य शुल्क (प्रति भेट), ४) भूल शुल्क (प्रति भेट), ५) शस्रक्रिया शुल्क, ६) शस्रक्रिया सहायक शुल्क, ७) भूल सहायक शुल्क (प्रति भेट), ८) शुश्राषा शुल्क (प्रति भेट), ९) सलाईन व रक्त संक्रमण शुल्क, १०) विशेष भेट शुल्क, ११) मल्टीपॅरा मॉनिटर शुल्क, १२) पॅथोलोजी शुल्क, १३) ओक्सिजन शुल्क, १४) रेडियोलोजी शुल्क १५) सोनोग्राफी शुल्क आदि १५ प्रकारच्या सुविधांचे शुल्क दर्शनी भागात प्रदर्शित करणे आवश्यक होते.
सत्यमेव जयते या संघटनेच्या तक्रार पत्राची दखल घेत डॉ. आनंद गोसावी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांनी पालिकेच्या हद्दीतील सर्व खाजगी रुग्णालय यांना दरपत्रक लावण्याबाबत या आधी दोनदा नोटीस बजावली होती, परंतु ज्या खाजगी रुग्णालय यांनी याची दखल घेतली नाही, अशा सर्व रुग्णालयांना शेवटच्या पाच दिवसाची मुदत देत ज्यांना याचे पालन केले नाही. त्यांची रुग्णालय नोंदणी परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल असा ईशारा देण्यात आहे. जो पर्यंत खाजगी रुग्णालये याची अंमलबजावणी करणार नाही याचा पाठपुरावा आम्ही करत राहू असे सुनील शिरीषकर, राज्य महासचिव, सत्यमेय जयते संघटनेचे पदाधिकरी यांनी म्हटले आहे. आपला,सुनील शिरीषकर,राज्य महासचिव सत्यमेव जयते संघटना.