⏺️ *तालुक्याच्या वजनदार नेत्याने मध्यस्थी करून दिला शिवसेनेच्या कार्यकर्त्याला न्याय: शिवसेनेमध्ये उत्साहाचे वातावरण*
⏺️ *मुख्य कार्यकारी अधिकारी नेमले तीन अधिकाऱ्यांची समिती: उपअभियंता यांनी दिले गेट हटवण्याचे आदेश*
⏺️ *माजी आमदार सुभाष बने आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांच्या रत्नसिंधू विरोधात पुकारलेल्या उपोषणाला अखेर मिळाला न्याय*
⏺️ *विजय लोकशाहीचा सांगत शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी केला जल्लोष*
⏺️ *उपोषणाला येऊ नये म्हणून संबंधितांकडून गलिच्छ राजकारण: मात्र दत्तजयंती दिवशी दत्ताने दिला न्याय*
रत्नागिरी प्रतिनिधी संगमेश्वर तालुक्यातील देवरूख पंचायत समिती कार्यालयासमोर शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य अजित गवाणकर यांनी रत्नसिंधू येथील विकासकामांबाबत चौकशी व्हावी या करिता उपोषण छेडले होते. माझा अधिकार माझा विकास या ब्रीद वाक्य प्रमाणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत स्वतःच्या मालकीच्या जागेमध्ये शासनाचा निधी वापरल्याचा आरोप करत त्या ठिकाणी केलेले विविध कामावरती स्वतःचे वर्चस्व राबवण्याचे काम केले असल्याचे सांगत त्याची चौकशी व्हावी यासाठी उपोषण सुरू होतं मात्र आज सहाव्या दिवशी हे उपोषण स्थगित करण्यात आले. यावेळी जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी आणि गटविकास अधिकारी देवरुख व जिल्हा परिषद बांधकाम उप अभियंता देवरुख या तिघांच्या लेखी पत्रानंतर सहाव्या दिवशी उपोषण मागे घेण्यात आले आहे. साडवली ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये असणाऱ्या रत्न सिंधूच्या कंपाउंडमध्ये शासनाचा निधी वापरला असे बोलले जात होते मात्र त्याची चौकशी व्हावी यासाठी अजित गवानकर यानी पत्रव्यवहार केला त्याची दखल न घेतल्याने उपोषणाला करावे लागले. उपोषणाला सहा दिवस उलटला रोज वेगवेगळे अधिकारी अजित गवाणकर आणि उपोषणकर्त्यांची चर्चा करत होते मात्र त्या मधून कायचं निष्पन्न होत नव्हते.अजित गवानकर संबंधितांवर कारवाई करा आणि सार्वजनिक जी जी काम केले आहेत ते सर्वांसाठी उघडे करा या मागणीवर ठाम होते. मात्र प्रशासनाने उशिरा का होईना सहाव्या दिवशी या उपोषणाची दखल घेत अनेक अधिकारी आणि वरिष्ठ लोकांशी चर्चा करत रत्नसिंधू येथील रस्त्याला बसवलेले गेट हटवण्यासाठी आदेश दिले असून ग्रामपंचायत साडवली यांना उप अभियंता देवरुख यांनी पत्र पाठवले आहे संबंधित गेटवर त्वरित कारवाई करून त्याचा अहवाल सादर करा असे त्या पत्रा मध्ये नमूद करण्यात आले आहे. त्याची प्रत श्री.पराग सुभाष बने व इतर यांना सुद्धा देण्यात आली असून त्या पत्रावर माजी आमदार सुभाष बने यांची पत्र पोच झाल्याची स्वाक्षरी घेण्यात आले आहे. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी असणारे उर्वरित कामाची चौकशीसाठी तीन लोकांची समिती गठीत करण्यात आली आहे त्यामध्ये श्री.प्रकाश भोसले (सहाय्यक गटविकास अधिकारी चिपळूण) यांची समिती प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्यासमवेत श्री. हनुमंत शिवपुरे (उपकार्यकारी अभियंता लांजा), श्री. दिवाकर पाटील (उपकार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग लांजा) या दोघांची सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. या तिघांच्या अधिपत्याखाली रत्नसिंधू मध्ये झालेल्या कामांची चौकशी होणार असून त्या चौकशीमध्ये नेमकं काय सत्य पुढे येते हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे. या तिघांची नेमणूक मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केली असून त्यांच्या सहीचे पत्र अजित गवांणकर यांना देण्यात आले आहे. त्या दिलेल्या लेखी आश्वासनानंतर अजित गवांणकर यांनी पुकारलेल्या उपोषणाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. *शिवसेनेच्या वजनदा नेत्याच्या मध्यस्थीनंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्याला मिळाला न्याय*
रत्नसिंधू विरोधात ज्यांनी उपोषण केले ते माजी पंचायत समितीचे उपसभापती व विद्यमान पंचायत समिती सदस्य अजित गवाणकर जे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत. ज्या व्यक्तींच्या विरोधात उपोषण करण्यात आले होते ते रत्नसिंधू चे मालक आणि माजी आमदार सुभाष बने व त्यांचे चिरंजीव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान सदस्य रोहन बने हे होते. मात्र ज्या वेळेस अजित गवाणकर यांनी संबंधितांची तक्रार केली त्या वेळेस शिवसेनेचे नेते मंडळी किंवा पदाधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन संबंधित विषय तत्काळ मिटवणे गरजेचे होते मात्र कोणताही पदाधिकारी आणि कोणत्याही नेत्याने याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले नसल्याचे बोलले जात आहे. हे प्रकरण उपोषण यापूर्वीच मिटलं असतं पण कोणीही याकडे दखल घेण्यास तयार नव्हते शेवटी हे उपोषण सहा दिवस चालले आणि संगमेश्वर तालुक्यातील एका वजनदार नेत्याने यांची मध्यस्थी केली आणि शिवसेनेच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याचे काम त्यांच्या माध्यमातून झाले असल्याने सर्व सामान्य कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. *मात्र तालुक्यातील तो नेमका वजनदार नेता कोण याची चर्चा आता देवरूम मध्ये होऊ लागली आहे*
*अजित गवाणकरच्या माध्यमातून शिवसेनेतील सामान्य कार्यकर्त्याला मिळाला न्याय*
देवरुख मध्ये शिवसेनेमध्ये दोन गट असल्याचे बोलले जात आहे. त्या ठिकाणी होत असलेल्या राजकारणाला अनेक लोक कंटाळले असून रत्नसिंधू मधून होत असलेल्या शिवसैनिकांच्या अन्याया वरती कोणच वाचा फोडण्यासाठी पुढे येत नव्हते मात्र अजित गवाणकर जो आवाज उठून पुढे आले त्यांच्या माध्यमातून अनेक सर्वसामान्य शिवसैनिक कार्यकर्त्याला न्याय मिळाले असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे देवरूख मधील शिवसेनेचे एका गटामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
*उपोषणाला येऊ नये म्हणून संबंधितांकडून गलिच्छ राजकारण: मात्र दत्तजयंती दिवशी दत्ताने दिला न्याय*
अजित गव्हाणकर यांनी रत्नसिंधू विरोधात पुकारलेल्या उपोषणाला येऊ नये म्हणून संबंधितांकडून वेगळ्या पद्धतीचे राजकारण करण्यात आले होते. आपल्याकडे असणारे पदाचा गैरवापर करत आपले वजन आणि निष्ठा दाखवत संबंधित अधिकाऱ्यांना मी सांगेल ते काम करा असे वारंवार सांगितले जात होते आणि काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्याच्या उपोषणाकडे दुर्लक्ष करा असे अधिकार्यांना सांगितले होते मात्र देव लांब नसतो अन्यायाला न्याय मिळतो हे आजच्या उपोषनातून समोर आले आहे.शेवटी दत्तजयंती दिवशी दत्ता न्याय दिल्याचे बोलले जात आहे.
🔥 🔥 *सहा दिवसांच्या उपोषणानंतर नेमके मिळाले काय?*
👉 *१) रत्नसिंधुच्या चौकशीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नेमली समिती*
👉 *२) तालुक्याबाहेरील तीन अधिकारी करणार रत्नसिंधूच्या कामांची चौकशी*
👉 *३) शासनाचा निधी वापरून करण्यात आलेला रस्त्यावर बसवलेला गेक अनधिकृत असल्याचे प्रशासनाने केले मान्य*
👉 *सदरील गेट हटवण्याचे उप अभियंता बांधकाम देवरूख यांचे ग्रामपंचायत साडवली यांना पत्र*
👉 *शासनाचा निधी वापरून रत्नसिंधू मध्ये बांधण्यात आलेली विहीर होणार लोकांसाठी उघडी*
👉 *रत्नसिंधू मधील ओपन स्पेस होणार लोकांसाठी मोकळा*
👉 *रत्नसिंधू मधील इतर कामांची होणार कसून चौकशी*