मेष : संधी प्राप्त होईलसध्या ग्रहमानाची साथ उत्तम आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. ज्या गोष्टी इतरांवर अवलंबून कराव्या लागत होत्या, त्या स्वत: करण्याची उमेद वाटू लागेल. अडचणींची पाऊलवाट कमी होईल. शुभ गोष्टीचे संकेत वाढू लागतील. व्यवसायाच्या दृष्टीने अनेक संधी प्राप्त होतील. रोखीच्या व्यवहारांना गती मिळेल. खरेदी-विक्रीचे व्यवहार पूर्ण होतील. नवीन योजना अमलात आणणे शक्य होईल. नोकरदार वर्गाला कामाच्या बाबतीत असणारी चिंता मिटेल. अधिकारी वर्गाचे योग्य ते मार्गदर्शन मिळेल. आर्थिकदृष्ट्या बचतीत वाढ होईल. राजकीय क्षेत्रात रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. घरगुती वातावरण आनंदी राहील. भावंडांशी सुसंवाद साधाल. धार्मिक गोष्टींची ओढ राहील. आरोग्य उत्तम असेल.
वृषभ : आर्थिक सफलता मिळेलशुभ ग्रहांचे संकेत शुभ फलदायी ठरतील. वारंवार मनाला वाटणारी हुरहुर कमी होईल. अनपेक्षित काही प्रस्ताव समोर येतील. त्यामुळे कामातील उत्साह वाढेल. सुधारित गोष्टी घडू लागतील. व्यावसायिकदृष्ट्या उंच मजल मारणे शक्य होईल. ठरवून काही कामे लांबत होती, सध्या तसे न होता कामाच्या ठिकाणी भरघोस यश मिळेल. नोकरदार वर्गाला आनंदीदायक बातमी कळेल. वरिष्ठांचा वरदहस्त कायम राहील. आर्थिक सफलता मिळेल. राजकीय क्षेत्रात नव्याने पदार्पण कराल. जनसंपर्कातून शुभेच्छांचा वर्षाव होईल. नातेवाईकांच्या गप्पागोष्टींमध्ये रमून जाल. जोडीदाराशी मात्र बोलताना सूर घसरू देऊ नका. धार्मिक गोष्टींविषयी असलेली माहिती इतरांपर्यंत पोहोचवाल. मानसिक प्रसन्नता लाभेल. शारीरिक समतोल राखणे जमेल.
मिथुन : बचतीकडे लक्ष द्यादिनांक २६, २७ रोजी चंद्र व्ययस्थानातून भ्रमण करत आहे. या कालावधीमध्ये नियमांच्या बाहेर जाऊन कोणतेही काम करू नका. व्यवहाराच्या गोष्टींमध्ये भावनिक गोष्टींना थारा देऊ नका. वादविवादापासून लांब राहा. व्यवसायात सध्या तरी फार मोठे ध्येय ठेवून चालणार नाही, आहे त्या गोष्टींमध्येच समाधान मानावे लागेल. एकत्रित व्यवसाय सुरू करण्यापूर्वी परिस्थितीचा आढावा घ्या. नियोजन करून मगच निर्णय घ्या. नोकरदार वर्गाला दिलेल्या कामाची जबाबदारी योग्यरीत्या पार पाडावी लागेल. इतरांवर अवलंबून राहणे योग्य राहणार नाही. आर्थिकदृष्ट्या बचतीकडे लक्ष द्या. समाजमाध्यमांचा वापर भान ठेवून करा. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे कसे राहील, याच दृष्टिकोनाने प्रयत्न करा. शारीरिकदृष्ट्या योग्य साधनेला महत्त्व द्या.
कर्क : प्रयत्न सोडू नकासप्ताहाच्या सुरुवातीस वाटणारा उत्साह कायम टिकून ठेवा. चांगल्या गोष्टींसाठी करत असलेला प्रयत्न सोडू नका. दिनांक २८, २९, ३० रोजी कारण नसताना एखाद्या गोष्टीच्या भानगडीत पडू नका. अंगलट गोष्ट येणार नाही याची काळजी घ्या. बोलताना दोन शब्द कमी बोललेले केव्हाही चांगले. नम्रता हाच गुणधर्म अंगी बाणा. व्यावसायिकदृष्ट्या उत्पादनात विचारपूर्वक वाढ करा. घाईने कोणतीही कृती करू नका. नवीन गुंतवणूक आवक पाहून करा. नोकरदार वर्गाला जादा कामाची जबाबदारी कमी होणारी असेल. धावपळीच्या कामातून सुटका होईल. आर्थिकदृष्ट्या योग्य त्या वेळी खर्चाला लगाम घालावा लागेल. सार्वजनिक क्षेत्रात होणारे बदल स्वीकारावे लागतील. घरगुती वातावरणात एकमत कसे निर्माण करता येईल ते पाहा. मानसिक संतुलन राखा. प्रकृतीकडे लक्ष द्या.
सिंह : मार्गदर्शन मिळेलपूर्वार्धात होता होईल तेवढी बरीच कामे उरकून घ्या. त्यासाठी घाई केली तर हरकत नाही. दिनांक १, २ रोजी मात्र निर्णय लांबणीवर टाकावे लागतील. कोणत्याही गोष्टीचा अंदाज बांधताना विचार करावा लागेल. व्यावसायिकदृष्ट्या ताळतंत्र वेळीच नियंत्रित करावे लागेल. व्यापारी वर्गाने अनुभवी लोकांचा सल्ला घेणे गरजेचे ठरेल. दाही दिशांनी यश खुणावत असले, तरी सतर्कता बाळगावी लागेल. नोकरदार वर्गांचे नवे प्रयोग यशस्वी ठरतील. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल. आर्थिकबाबतीत खर्च कमी करण्यावर भर द्या. राजकीय क्षेत्रात मनासारखे निर्णय घेता येतील. मित्रपरिवाराकडून मिळणारी सहानुभूती मोलाची ठरेल. कौटुंबिक कलह कमी होईल. धार्मिक गोष्टीतील उत्साह वाढेल. प्रकृतीबाबतीत दुर्लक्ष करणे टाळा.
कन्या : नावलौकिक वाढेलचंद्राचे भ्रमण भाग्यस्थानातून लाभस्थानाकडे होत आहे. हातातोंडाशी आलेला घास नेहमी दूर होतो. सध्या तसे न होता तुमचीही आतुरता पूर्ण होणारी असेल. नेहमीपेक्षाही विशेष फलप्राप्ती होणारा सप्ताह ठरेल. व्यावसायिकदृष्ट्या सुधारित अवस्था येईल. यापूर्वी केलेल्या भांडवलातील वाढ फायदा मिळवून देणारे ठरेल. गिऱ्हाईकांची मने वळवण्यात यश मिळेल. ग्राहकराजा संतुष्ट असेल. नोकरदार वर्गाला नवीन बदलांचा परिणाम चांगला राहील. कामावरचा ताण कमी होईल. आर्थिकदृष्ट्या बचत मनासारखी करता येईल. राजकीय क्षेत्रात नावलौकिक वाढेल. मित्रपरिवाराकडून प्रेरणा मिळेल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे सहकार्य उत्तम राहील. वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल. मानसिकदृष्ट्या समाधान मिळेल. प्रकृतिस्वास्थ्य ठणठणीत राहील.
तूळ : करमणूक घडेलदिनांक २६, २७ रोजी आव्हानात्मक गोष्टी स्वीकारू नका. अनोळख्या व्यक्तीचा सल्ला घेताना विचार करा. उशीर झाला तरी चालेल स्वतङ्मचे निर्णय स्वत: घ्या. कुठेही उग्र प्रतिक्रिया देणे टाळा. नंतरचा कालावधी हा उत्तम राहील. व्यवसायातील आवक मनाला उभारी मिळवून देईल. सतत येणारे दडपण कमी झाल्याने कार्याची सुरुवात होईल. कला कौशल्याला वाव मिळेल. नोकरदार वर्गाला यशाची चाहूल लागेल. आर्थिक प्रगती चांगली असेल. सामाजिक स्तरावर ज्येष्ठांची कृपा प्राप्त होईल. नातेवाईकांसमवेत करमणूक घडेल. मुलांसाठी ठरवलेले रचनात्मक बदल करणे शक्य होईल. धार्मिक गोष्टीत सहभाग राहील. आहाराचे पथ्यपाणी सांभाळल्यास आरोग्य उत्तम राहील.
वृश्चिक : हेवेदावे दूर होतीलदिनांक २८, २९, ३० रोजी चालू घडी विस्कळीत होऊ देऊ नका. चौकसपणाने वागा. मनाची शक्ती वाढवा. द्विधा अवस्थेतून बाहेर पडा. कायदा व सुव्यवस्थेचे पालन करा. व्यवसायातील धाडसी योजना टाळा. तांत्रिक अडचणींचा पहिला विचार करा. त्यानंतरच गुंतवणूक करणे योग्य राहील. वनस्पतिजन्य व्यावसायिकांनी जास्तीची साठवणूक करू नका. गरजेपुरताच विचार करा. नोकरदार वर्गाला कामकाजाचे वेळापत्रक आधी ठरवावे लागेल. त्यानुसारच नियोजन आखावे लागेल. पैशांचा प्रश्न कमी करण्यासाठी तडजोड स्वीकारावी लागेल. सामाजिक क्षेत्रात सामोपचाराने तोडगा काढा. कुटुंबातील सदस्यांविषयी असलेले हेवेदावे दूर होतील. जोडीदाराच्या प्रकृतीत सुधारणा होतील. मानसिक शांतता टिकवून ठेवा. प्रकृतिस्वास्थ्य जपा.
धनू : प्रकृती जपाषष्ठस्थानातून अष्टमस्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत आहे. या सप्ताहात जाणूनबुजून अंगलट येणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करावे लागेल. मनाला थोडे शांत ठेवणे योग्य राहील. फटकळ बोलण्याने दुरावा निर्माण होऊ शकतो हे लक्षात ठेवा. अनर्थ बडबड करणे टाळा. व्यवसायात नवीन काही गुंतवणूक करू नका, आहे त्यातच बस्तान कसे बसेल यासाठी प्रयत्न करा. व्यावसायिकदृष्ट्या घाई-गडबड करून चालणार नाही. नोकरदार वर्गाने स्वतङ्मच्या कामाव्यतिरिक्त इतरत्र लक्ष घालू नका. वेळेचे महत्त्व जाणा. आर्थिकदृष्ट्या खर्चावर नियंत्रण ठेवा. सार्वजनिक ठिकाणी विनाकारणाची जोखीम स्वीकारू नका. कौटुंबिक वादविवाद करणे टाळा. मानसिकदृष्ट्या ताणतणाव कमी करा. उपासनेत मन रमवा. प्रकृती जपा.
मकर : अतिलोभ टाळादिनांक २८, २९, ३० रोजी कळत- नकळत बावरलेल्या मनाला सावरा. पूर्वी झालेल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा. मनाची ताकद वाढवा व स्थिरपणाने निर्णय घ्या. कोणत्याही गोष्टीचा अतिलोभ टाळा. धंद्यातील वाढते स्वरूप लक्षात घेताना अवघड वाटणाऱ्या गोष्टींचा टप्पा पार कराल. नवे तंत्र आत्मसात करणे सोपे जाईल. मागील तुटवडा भरून काढाल. नोकरदार वर्गाला बदलत्या नियमानुसार कामाचे नियोजन करावे लागेल. आर्थिकदृष्ट्या गरजेपुरता खर्च करून इतर खर्च टाळा. राजकीय क्षेत्रात तुमचे मुद्दे इतरांना पटवून देताना शब्द गोडीचे ठेवा. कुटुंबाशी हसतखेळत राहण्याचा प्रयत्न करा. जोडीदाराच्या भावना जपा. आहारावरती नियंत्रण ठेवा. प्रकृतीची काळजी घ्या.
कुंभ : चढ-उतार राहीलहातातील हात घट्ट ठेवा. तसाच ग्रहांचा सूर चांगला करण्याचा प्रयत्न करा. दिनांक १, २ रोजी संयमाचा बांध मात्र ढळू देऊ नका. महत्त्वाचे निर्णय घेणे टाळा. व्यापारी क्षेत्रात तोट्याचे स्वरूप लक्षात घ्या. त्यानुसारच हालचाल राहू द्या. अचानक कोणतेही बदल करू नका. प्रत्येक गोष्टींचे पाऊल धैर्य बाळगून टाका. त्यामुळे नुकसान होणार नाही. चढ – उतारांचा सामना होत राहील. नोकरदार वर्गाने हेवेदावे बाजूला ठेवावे. सध्या नोकरीचा व्याप लक्षात घ्या. नेमक्या गोष्टींचा आढावा घ्या. आर्थिक येणी वसूल करताना काळजी घ्या. राजकीय क्षेत्रात नियोजनाअभावी कोणतीही गोष्ट करू नका. मुलांचे कौतुकास्पद वागणे मनाला उभारी देणारे असेल. कौटुंबिक सुख उत्तम असेल. प्रकृती ठीक राहील.
मीन : योग्य निर्णय घ्यालशुभ ग्रहांची साथ मिळेल. सतत दडपण वाढणाऱ्या गोष्टींचे अस्तित्व कमी होईल. आखून ठेवल्याप्रमाणे कामे होत राहतील. किचकट गोष्टींचा सामना करावा लागणार नाही. व्यवसायात अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. विविध स्तरावरून निर्माण झालेल्या अडचणी सोडवता येतील. मोठ्या कारखानदारीचा प्रश्न निकालात लागेल. भांडवलात वाढ होईल. नोकरदार वर्गांची झालेली अस्वस्थता दूर होईल. कामकाजाच्या दृष्टीने योग्य निर्णय घ्याल. आर्थिकदृष्ट्या परिपूर्णता येईल. सार्वजनिक स्तरावर तुमचे सहकार्य कौतुकास्पद असेल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या प्रकृतीची चिंता मिटेल. मानसिकदृृष्ट्या द्विधा अवस्था कमी होईल. धार्मिक गोष्टींची ओढ राहील. प्रकृती उत्तम असेल.