मेषमेष : सामंजस्याने कृती कराअमावास्या कन्या राशीतून तुमच्या षष्ठस्थानात होत आहे. तेव्हा या कालावधीमध्ये कोणताही निर्णय विचाराने घेतला पाहिजे. आपल्या बोलण्यातून समोरच्या व्यक्तीला गैरसमज वाटणार नाही याची काळजी घ्या. एक घाव दोन तुकडे करण्याची सवय बदला. प्रत्येक वेळी सामंजस्याने कृती करा. नोकरदारवर्गाला कामकाजात बदल करावे लागतील. वरिष्ठांच्या मर्जीशिवाय कोणतीही हालचाल करणे टाळा. व्यवसाय वाढीसाठी केलेल्या जाहिरात माध्यमांचा उपयोग होईल. ग्राहकांशी संपर्क वाढेल. आवक उत्तम राहील. सार्वजनिक गोष्टींची आवड निर्माण होईल. नात्यातील सलोखा वाढेल. कुटुंबातील ज्येष्ठांचा आदर करा. जोडीदाराला विश्वासात घेऊन पुढील गोष्टींचे आयोजन करा. द्विधा अवस्था टाळा. योग्य समतोल राखा.
वृषभवृषभ : खर्चावर नियंत्रण ठेवाअमावास्या पंचमस्थानातून होत आहे. ही अमावास्या विशेष लाभदायी ठरेल. काही नियोजन ठरवून ठेवले तरी त्यात बदल करावे लागतात व आयत्या वेळी पळापळ होते असा अनुभव सप्ताहात आल्याशिवाय राहणार नाही. ही पळापळ चांगल्या गोष्टींसाठी असेल. दिनांक ७, ८ रोजी मात्र क्रोधावरती नियंत्रण ठेवा. बोलण्यातून राग दाखवून देऊ नका. नोकरदारवर्गाला नेहमीपेक्षा जास्त कामाची जबाबदारी अंगावर पडेल. ही जबाबदारी योग्यरीत्या पार पाडाल. व्यावसायिकदृष्ट्या मनासारखे दिवस निर्माण होतील. रोखठोक बोलण्याने गिऱ्हाईकांची मने दुखावली जाणार नाहीत. याची मात्र काळजी घ्या. व्यवहार व भावनिक गोष्टी योग्य पद्धतीने हाताळा. आर्थिकदृष्ट्या खर्चावर नियंत्रण ठेवा. सामाजिक क्षेत्रात सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन कराल. आरोग्याची काळजी घ्या.
मिथुनमिथुन : उत्साह वाटेलअमावास्या चतुर्थ स्थानातून होत आहे. तेव्हा अनुभवाची शिदोरी कायम जवळ ठेवा व अमावास्या प्रहर सुखकर करा. स्वतङ्महून कोणत्याही जुन्या गोष्टी उगाळून काढू नका. नोकरदारवर्गाने वरिष्ठांना झालेल्या कामाच्या नोंदी वेळोवेळी दाखवा. त्यामुळे कोणतेही गैरसमजाचे वादळ राहणार नाही. व्यावसायिकदृष्ट्या सुधारित घटनांचा ओघ राहील. उत्पादन भरघोसरीत्या वाढवता येईल. कला क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. नव्या संकल्पना बहरतील. आर्थिकदृष्ट्या मागील उसनवारी वसूल होईल. राजकीय क्षेत्रात ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घेतल्याने पुढील मार्ग सुखकर ठरेल. नव्या ओळखीचा फायदा होईल. घरातील वयोवृद्ध व्यक्तींच्या तब्येतीत सुधारणा घडेल. मानसिकदृष्ट्या समाधान लाभेल. एकूणच सप्ताह उत्साहवर्धक वाटेल. आरोग्य उत्तम राहील.
कर्ककर्क : चौफेर प्रगती होईलअमावास्या पराक्रम स्थानातून होत आहे. हातातोंडाशी आलेल्या गोष्टी आता पूर्णत्वाला जातील. अमावास्या शुभ फळ देणारी ठरेल. नोकरदारवर्गाला कामाचा योग्य असा परतावा मिळेल. मागील काही बाकी राहिलेली कामे यशस्वी होतील. व्यवसायात अनपेक्षित अशी वाढ झाल्याने कामातील उत्साह वाढलेला असेल. व्यवसायात नवीन योजना राबविण्यात यश मिळेल व चौफेर प्रगती होईल. भागीदारी व्यवसायात ठरवलेल्या प्रस्तावांना चालना मिळेल. नवीन प्रस्ताव स्वीकाराल. रोखीच्या व्यवहारांना महत्त्व दिल्याने आर्थिक प्रगती उत्तम असेल. राजकीय क्षेत्रातील फुगवटा कमी होईल. शेजारधर्माशी संबंध जेवढ्यास तेवढा ठेवा. कुटुंबातील सदस्यांना समजून घ्याल. जोडीदाराची साथ राहील. धार्मिक गोष्टीत सहभाग असेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
सिंहसिंह : कामाचा दर्जा सुधारेलअमावास्या धनस्थानातून होत आहे. हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच गोष्टी अनुकूल होत होत्या. सध्या दोलायमान परिस्थितीतून बाहेर पडणे शक्य होईल. अनेक गोष्टींमध्ये स्थिरता येईल. नोकरदारवर्गाचा कामाचा दर्जा सुधारलेला असेल. अधिकारपदासाठी आता संघर्ष करावा लागणार नाही. व्यवसायात एक ना धड भाराभर चिंध्या असेच गणित होते. सध्या नवीन गुंतवणूक करणे भीतीचे वाटणार नाही. मोठा व्याप सांभाळणे आता कठीण नाही. व्यवसायातील चलनवलन मार्गी लागेल. पैशांची अडचण कमी होईल. सामाजिक माध्यमांचा वापर योग्य ठिकाणी कराल. भावंडांविषयी असलेला तिढा सुटलेला असेल. नातेवाईकांशी संपर्क वाढेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. शारीरिकदृष्ट्या आरोग्याची साथ राहील.
कन्याकन्या : अनुभवाची शिदोरी जपा अमावास्या तुमच्याच राशीतून होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला दिनांक ३, ४ रोजी कोर्टकचेरी भानगडीपासून एक पाऊल मागे आलेले चांगले. एका दगडात दोन पक्षी मारण्याचा डाव सध्या तरी करू नका. अशी घाई करण्याने कोणतेच कार्य सिद्ध होत नाही. अनुभवाची शिदोरी जपा. इतरांचा सल्ला घेण्याची गरज वाटू देऊ नका. नोकरदारवर्गाला जादा कामकाजाचे नियोजन वेळेत पूर्ण होईल. व्यवसायात नेहमीप्रमाणे वाटणारी धरसोड वृत्ती कमी करा. धाडसी निर्णय घेताना रोखीच्या व्यवहारांना महत्त्व द्या. भागीदारी व्यवसायात स्वतङ्महून पडू नका. योग्य अशी तरतूद केल्यास आर्थिक घडी विस्कळीत होणार नाही. सार्वजनिक क्षेत्रात मदत कराल. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. पथ्यपाणी सांभाळल्यास आरोग्याची तक्रार कमी होईल.
तूळतूळ : नियमांच्या चौकटीत राहाअमावास्या व्ययस्थानातून होत आहे. या कालावधीमध्ये दुसऱ्यांच्या वैयक्तिक गोष्टीत हस्तक्षेप करणे टाळा. क्रोधावरती नियंत्रण ठेवा. कोणतीही गोष्ट करताना नियमांच्या चौकटीत राहून करा. बोलण्यातील स्वर कमी आवाजाचा राहू द्या. नोकरदार वर्गाला कामकाजा व्यतिरिक्त इतर गोष्टींसाठी वेळ द्यावा लागेल. व्यवसायाच्या निमित्ताने अनेक व्यक्तींशी संपर्क साधाल. या संपर्कामुळे व्यवसाय वाढीचे परिणाम चांगले मिळतील. नवनवीन व्यवसायाच्या कल्पना प्रत्यक्षात उतरवणे शक्य होईल. आर्थिक बाबतीत आवक बघून जावक ठरवा. खर्च कमी करण्याचा प्रयत्न करा. राजकीय क्षेत्रात वरिष्ठांच्या आदेशानुसार हालचाली कराव्या लागतील. मित्र परिवाराची मदत मिळेल. मानसिकदृष्ट्या समतोलता राखा. आध्यात्मिक गोष्टीत मन रमवा. शारीरिकदृष्टया फार दगदग करणे टाळा.
वृश्चिकवृश्चिक : स्वहित साधाअमावास्या लाभस्थानातून होत आहे. ही अमावास्या नक्कीच काही चांगले शिकवून जाणारी आहे. दिनांक ७, ८ रोजी धांदरटपणाने कोणती गोष्ट करू नका. बोलण्याच्या भरात जास्तीची जबाबदारी घेणे टाळा. मोजक्याच गोष्टी लक्षात घ्या. नोकरदार वर्गाने मागचे तसेच पुढे असे दिवस राहणार नाही. त्यात होणारे बदल निश्चितच फायद्याचे असतील. व्यावसायिकदृष्ट्या स्पर्धेच्या मागे न लागता स्वहित कसे साधता येईल याकडे लक्ष द्या. अवाढव्य व्याप विनाकारण वाढवू नका. कर्जाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. कर्जफेड वेळेत करा. राजकीय क्षेत्रात तुमच्या शब्दाला वजन असेल. मित्रमंडळींच्या कुटुंबाविषयी जी चिंता होती ती मिटलेली असेल. उपासना फलद्रूप होतील. शारीरिकदृष्ट्या योग साधनेला महत्त्व द्या.
धनुधनू : व्यक्तिमत्त्व खुलेलअमावास्या दशमस्थानातून होत आहे. न झेपणाऱ्या जबाबदारीतून सुटका करून घेणे जमेल. त्यामुळे सुटकेचा निश्वास मिळेल. भाग्यस्थानातून लाभस्थानाकडे होणारे चंद्राचे अनुकूल भ्रमण शुभदायक असेल. न ठरवता एखादी गोष्ट सहज होऊन जाईल. आदरणीय आशा व्यक्तींची भेट होईल. या भेटीच्या आनंदाने व्यक्तिमत्त्व खुललेले असेल. नोकरदारवर्गाला वरिष्ठांच्या सल्ल्याचा फायदा होईल. कामातील त्रास कमी झाल्याने कष्टसाध्य ध्येय गाठाल. व्यवसायात ग्राहकवर्गाकडून आलेल्या मागणीनुसार पुरवठा करावा लागेल. त्यामुळे उत्पन्न वाढीत भर पडेल. सुधारित घटनांचा ओघ वाढेल. आर्थिक बाबतीत प्रगतीची वाट राहील. राजकीय क्षेत्रात शांततेने तोडगा काढता येईल. मुलांसाठी करमणुकीत वेळ जाईल. घरगुती वातावरण आनंदी राहील. आरोग्याची साथ मिळेल.
मकरमकर : घडामोडी होत राहतीलदिनांक ३ , ४ रोजी समजुतीने प्रत्येक गोष्ट करावी लागेल. तडजोडीतून केलेल्या गोष्टींचा फायदा होईल. न पेलणाऱ्या बाबींसाठी ताकद पणाला लावू नका. अमावास्या भाग्यस्थानातून होत आहे. या कालावधीत चांगल्या घडामोडी होत राहतील. नोकरदार वर्गाला कामकाजाच्या बाबतीत सतर्क राहिल्याने वरिष्ठांशी गैरसमज टळेल. व्यवसायात भागीदारीच्या दृष्टीने ठेवलेली वाटचाल योग्य असेल. मात्र हिशोबाचे ताळतंत्र वेळीच तपासून पाहा. व्यवसायात काही निर्णय घेताना परिस्थिती पाहून घ्यावे लागतील. मिळालेल्या पैशांची गुंतवणूक ताबडतोब करा. समाजसेवेची आवड निर्माण होईल. नातेवाईकांशी काही कार्यक्रमानिमित्त भेट घडेल. भावंडांविषयी योग्य तो निर्णय घ्या. जुन्या व्याधींकडे वेळीच लक्ष दिल्यास आरोग्य उत्तम राहील.
कुंभकुंभ : प्रगतीकडे लक्ष द्याअमावास्या अष्टमस्थानातून होत आहे. या कालावधीमध्ये स्वतङ्मला त्रास होईल अशा गोष्टींचा मोह सोडून द्या. टोकाची भूमिका न घेता शांत राहणे केव्हाही चांगले. चांगल्या गोष्टींसाठी वेळ गेला तरी चालेल. ज्या घडामोडी तुमच्यासमोर चालल्या आहेत. त्यासाठी प्रतिक्रिया देणे जरुरीचे समजू नका. नोकरदार वर्गाने कामाव्यतिरिक्त इतरत्र वेळ घालवू नका. त्यामुळे मानसिकदृष्ट्या तणाव निर्माण होऊ शकतो. व्यावसायिकदृष्ट्या आपली आवक कशी वाढवता येईल, त्यासाठी प्रयोग करा. संधी चालून येण्याची वाट पाहू नका. उसनवारी करून गुंतवणूक वाढवू नका. आर्थिकदृष्ट्या प्रगतीकडे लक्ष द्या. सार्वजनिक क्षेत्रात हस्तक्षेप करू नका. सासरवाडीकडील लोकांशी चर्चासत्रातून वाद टाळा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
मीनमीन : परिस्थितीनुसार निर्णय घ्याषष्ठस्थानातून अष्टमस्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत आहे. पूर्वी केलेल्या चुका वारंवार करू नका. ज्या गोष्टीतून काहीही साध्य होणार नाही, त्यासाठी प्रयत्न करू नका. एखाद्याला चांगला सल्ला तुम्ही दिला तरी समोरच्या व्यक्तीचा गैरसमज होईल. तेव्हा सध्या शांत राहिलेले चांगले. नोकरदार वर्गाला कामकाजातील एखादी गोष्ट मनाला नाही पटली तरी ती करावी लागेल. परिस्थितीनुसार निर्णय घ्यायला शिका. व्यवसायात आहे त्यातच समाधान मानणे इष्ट ठरेल. व्यवसायात वाढ नाही झाली तरी चालेल. परंतु उधारीवर व्यवसाय करू नका. आर्थिक बाबतीत सतर्क राहा. राजकीय घडामोडींपासून लांब राहिलेले चांगले. कुटुंबातील वातावरण तप्त होणार नाही याची काळजी घ्या. मानसिकदृष्ट्या सतत विचार करणे टाळा. आरोग्याच्या बाबतीत हलगर्जीपणा करू नका.