आता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये, बिहारच्या पूर्व चंपारण जिल्ह्यात एका शाळेच्या मुख्याध्यापकाच्या पदासाठी दोन शिक्षक भांडताना दिसत आहेत. ही घटना जिल्ह्यातील मोतिहारी शहरातील राज्य शिक्षण विभागाच्या कार्यालयात बुधवारी घडली. शाळा प्रशासनाने मागितलेली कागदपत्रे सादर करण्यासाठी हे दोघे शिक्षण विभागाच्या कार्यालयात गेले तेव्हा परिस्थिती हिंसक झाली. या घटनेचा एक व्हिडीओ ऑनलाइन समोर आला आणि त्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला.
अहवालांनुसार, शिवशंकर गिरी आणि प्रतिस्पर्धी शिक्षिका रिंकी कुमारी यांचे पती या दोघांनी शाळेतील मुख्याध्यापक म्हणून पद सांभाळण्यासाठी कोण अधिक वरिष्ठ आणि पात्र आहे यावर वाद घातला आणि एकमेकांना शाब्दिक आणि शारीरिक शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
शिवशंकर गिरी आणि रिंकी कुमारी हे दोघे गेल्या तीन महिन्यांपासून आदरपूर येथील एका प्राथमिक शाळेत मुख्याध्यापकाच्या पदासाठी प्रयत्न करत होते. व्हिडीओमध्ये तीन ते चार व्यक्ती देखील दिसत आहेत. त्या व्यक्ती भांडण सोडवण्याचा प्रयत्नही करतना दिसत आहेत. ते दोघे अगदी लहान मुलांप्रमाणे भांडत आहेत.
हा व्हिडीओ अनिर्बन भट्टाचार्य या ट्विटर वापरकर्त्याने पोस्ट केला आहे. आत्तापर्यंत या व्हिडीओला अनेकांनी पाहिलं आहे तसेच हा व्हिडीओसुद्धा शेअर केला. अनेकांनी घडलेली घटना किती चुकीची आहे असं स्पष्ट मतही व्यक्त केलं आहे.