भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारी स्टार खेळाडू पीव्ही सिंधू हिला ८ नोव्हेंबर २०२१ रोजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल हिलाही राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार मिळाला. दरम्यान, पीव्ही सिंधूची एक इन्स्टाग्राम रील सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
इंस्टाग्रामवरील या व्हिडीओ क्लिपमध्ये पीव्ही सिंधू पारंपारिक ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. पार्श्वभूमीत ‘सीके द फर्स्ट’ अल्बमचे प्रेमगीत वाजत होते. त्यावर पीव्ही सिंधूने मस्त डान्स केला. तिच्या या व्हिडीओला ३ लाखांहून अधिक व्ह्यूज आणि २००० हून अधिक कमेंट्स आल्या आहेत. इंस्टाग्राम युजर्स तिच्या डान्सचे आणि लूकचे खूप कौतुक करत आहेत.
पीव्ही सिंधूचा लूक पाहून अनेक यूजर्सनी तिला राणी म्हटले. कमेंट्स केलेल्यामध्ये अनेक सेलिब्रिटींचाही समावेश आहे. मॉडेल लक्ष्मी मंचूने पीव्ही सिंधूचे वर्णन अतिशय क्यूट असल्याचे सांगितले. पीव्ही सिंधूनेही तिचे वेगळ्या पद्धतीने आभार मानले. एका युजरने लिहिले, ‘मॅडम तुम्ही खूप सुंदर दिसत आहात.’ तर दुसऱ्या युजरने सिंधूला भारतातील सर्वात सुंदर मुलगी म्हटले.
काही लोकांनी मात्र सिंधूला तिच्या खेळावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. एका युजरने लिहिले, ‘मॅडम कृपया तुमच्या प्रशिक्षणावर आणि ट्रेनिंग लक्ष केंद्रित करा.’ दुसऱ्या युजरने लिहिले, ‘मॅडम सुपर. तुम्ही खूप सुंदर दिसत आहात.