नवी दिल्ली | कोरोनाकाळापासून ओटीटी प्लॅटफॉर्मचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सोशल मीडिया प्रमाणेच ओटीटीलाही नेटकऱ्यांची पसंती आहे. ओटीटीमुळे मनोरंजनासाठी घरबसल्या आपल्या आवडते चित्रपट, मालिका पाहता येतात. पण नेटफ्लिक्स, अॅमेझॉन यांसारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट पाहायचे म्हणजे मोबाईल डेटाही मोठ्या प्रमाणात वापरला जातो.
नेटफ्लिक्ससारखे ओटीटी प्लॅटफॉर्म हे पेड असतात. त्यात नेटफ्लिक्ससाठी डेटाही मोठ्या प्रमाणात वापरला जातो. तर आता नेटफ्लिक्स पाहताना काही सोप्या टिप्स फॉलो करा तुमचा मोबाईल डेटा वापरा. डेटा सेंटिग्जमध्ये बदल केला की मोबाईल डेटा कमी प्रमाणात खर्च होतो. नेटफ्लिक्स हे वापरकर्त्यांना चार प्रकारच्या सेटिंग्ज देत असते तर व्हिडीओ क्वाॅलिटी अॅडजस्ट करूनही तुम्ही मोबाईल डेटा सेव्ह करू शकता.
नेटफ्लिक्स अॅपमध्ये गेल्यानंतर सर्वात आधी व्हिडीओ प्ले-बॅक ऑप्शनमध्ये जाऊन डेटा युसेज ऑप्शन सिलेक्ट करायचा. यावेळी तुम्हाला चार प्रकारच्या सेटिंग्ज दिसतील. वायफाय ओनली, सेव्ह डेटा, ऑटोमॅटिक आणि मॅक्सिमम या चार सेटिंग्जपैकी तुमच्या सोयीची सेटिंग तुम्ही निवडू शकता. तर नेटफ्लिक्सवर डेटा स्पीड देखील चेक करू शकता.
जर नेटफ्लिक्स वापरताना तुम्हाला डेटा सेव्ह करायचा असेल तर तुम्हाला व्हिडीओ क्वाॅलिटी कमी करावी लागेल. व्हिडीओ क्वाॅलिटी कमी करणं हा मोबाईल डेटा वापरण्यासाठी सगळ्यात उत्तम पर्याय आहे. या काही सोप्या टिप्स फॉलो केल्या तर नेटफ्लिक्सचा आनंद घेताना तुमचा मोबाईल डेटाही वाचवू शकता.